जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उकाडा वाढतोय! आजारांना निमंत्रण, घाबरू नका; 'अशी' काळजी घ्या

उकाडा वाढतोय! आजारांना निमंत्रण, घाबरू नका; 'अशी' काळजी घ्या

उन्हाळ्यात कावीळचाही मोठा धोका असतो. शिळं खाल्ल्याने किंवा प्यायल्याने कावीळ होऊ शकते.

उन्हाळ्यात कावीळचाही मोठा धोका असतो. शिळं खाल्ल्याने किंवा प्यायल्याने कावीळ होऊ शकते.

वाढतं तापमान अनेक प्रकारचे आजार बरोबर घेऊन येतं, पोटापासून डोळे आणि त्वचेपर्यंत सगळीकडेच उन्हाचा परिणाम दिसतो. शिवाय या दिवसांत अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही प्रचंड असतो.

  • -MIN READ Local18 Bhopal,Madhya Pradesh
  • Last Updated :

विनय अग्निहोत्री, प्रतिनिधी भोपाळ, 20 जून : दरवर्षीच्या तुलनेत यंदा जरा जास्तच उकाडा जाणवतोय, असं आजकाल प्रत्येकाकडून ऐकायला मिळतंय. त्यातच जून महिना म्हणजेच एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे पावसाची चाहूल. अशा या उष्ण-दमट वातावरणात आजारांना जणू आमंत्रणच मिळतं. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणंच फायदेशीर ठरतं. अन्यथा पोटदुखी, सर्दी-खोकला, हगवण, अशा आजारांमुळे रुग्णालयाची पायरी चढावी लागते. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील डॉक्टर दिपक यांनी सध्या दिल्ली ते मुंबई सर्वत्र जाणवणारा भीषण उकाडा लक्षात घेऊन लोकांना उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘वाढतं तापमान अनेक प्रकारचे आजार बरोबर घेऊन येतं, पोटापासून डोळे आणि त्वचेपर्यंत सगळीकडेच उन्हाचा परिणाम दिसतो. शिवाय या दिवसांत अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही प्रचंड असतो’, असं त्यांनी सांगितलं.

News18लोकमत
News18लोकमत

‘उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे ताजे अन्नपदार्थ खावे, पाणीदेखील उकळून प्यावं’, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शिळे अन्नपदार्थ खाल्ल्यास विविध प्रकारच्या व्याधी जडू शकतात. वाढत्या तापमानामुळे पदार्थांमध्ये विषाणू निर्माण होतात. अन्नासह हे विषाणू पोटात गेल्यास पोटदुखी, मळमळ, अस्वस्थपणा, उलटीसारखं होणे, इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळावं. घरातील स्वयंपाकघरात स्वच्छता पाळावी आणि ताजंच खावं. Yoga Day 2023 : म्हातारपणामुळे शरीर थकलंय? ‘ही’ सोपी योगासनं करा आणि राहा फिट, Video सर्वात महत्त्वाचं म्हणजे उकाड्यात घामावाटे घारीरातील पाणी बाहेर जात असल्याने या दिवसांमध्ये आपल्याला पाण्याची नेहमीपेक्षा जास्त गरज भासते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास अशक्तपणा, कमकुवतपणा यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शिवाय तापही येऊ शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या, शरीराचा ओलसरपणा टिकवून ठेवा, अन्यथा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येईल. पाण्याअभावी त्वचा निस्तेज होऊ शकते. उन्हाळ्यात कावीळचाही मोठा धोका असतो. शिळं खाल्ल्याने किंवा प्यायल्याने कावीळ होऊ शकते. कावीळ म्हणजेच आपल्या यकृताच्या नियमित कामकाजात मोठा बिघाड होतो. ज्याचा परिणाम चेहऱ्यावर, त्वचेवर, लघवीवर दिसून येतो. त्वचा आणि डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसतो, शिवाय लघवीही पिवळसर होते. ही कावीळ जीवघेणीही ठरू शकते. त्यामुळे या भीषण उकाड्यात स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात