मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Shocking! 'डोकेदुखी'ने घेतले लागोपाठ 5 बळी; अज्ञात आजारामुळे उडाली खळबळ

Shocking! 'डोकेदुखी'ने घेतले लागोपाठ 5 बळी; अज्ञात आजारामुळे उडाली खळबळ

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

असा आजार ज्यात मृत्यूआधी तीव्र डोकेदुखी होते, नाकातून रक्तस्राव होतो आणि जीव जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

डोडोमा, 18 मार्च : कोरोनाची वाढती प्रकरणं, त्यातर H3N2 चं थैमान आणि आता आणखी एका अज्ञात आजाराने टेन्शन वाढवलं आहे. या रहस्यमयी आजारामुळे सर्वांची झोप उडाली आहे. या आजारात सर्वात आधी डोकेदुखी होते त्यानंतर इतर काही लक्षणं दिसतात आणि रुग्णाचा जीव जातो. टान्झानियात या आजाराने दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत 5 बळी गेले आहेत.

पूर्व आफ्रिकेतील टान्झानियात अज्ञात आजारामुळे एकामागोमाग एक अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 7 रुग्ण आढळून आले आहेत. ही सर्व प्रकरणं कजेरातील आहेत. हा रहस्यमयी आजार काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहे. पण त्याचं गूढ अद्यापही डॉक्टरांना उलगडलेलं नाही.

राज्यात H3N2 चा कहर! घेतले 3 बळी; कसा वाचवाल तुमचा जीव? डॉक्टरांनी सांगितले बचावाचे 5 उपाय

या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला ताप येतो, त्यानंतर डोकेदुखी होते. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या मृत्यूपूर्वी तीव्र डोकेदुखी झाली आणि नाकातून रक्त आलं होतं.

मिरर यूकेच्या वृत्तानुसार टान्झानियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तुमैनी नागू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सरकारने स्थानिक पथकासह या आजाराचा तपास सुरू केला आहे. तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की जर तुम्हाला कुणामध्ये अशी लक्षणं दिसत असतील तर त्यांच्यापासून दूर राहा आणि पॅनिक होऊ नका.

यामुळे वाचला सुष्मिताचा जीव; आपल्याला हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करायचं? तज्ञांनी दिला सल्ला

दरम्यान अशीच लक्षणं असलेले रुग्ण जुलै 2022 मध्येही सापडले होते. त्यावेळी तीन जणांचा मृत्यू झाला होता. नंतर हा लेप्टोस्पायरोसिस असल्याचं सांगण्यात आलं. जनावरांच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार पसरतो. यात उंदीर, गाय, डुक्कर आणि कुत्रे यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Disease symptoms, Health, Lifestyle, Rare disease