कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस थैमान घालतो आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात याचे रुग्ण आढळले असून यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
2/ 6
महाराष्ट्रात H3N2 चे आतापर्यंत एकूण 352 रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
3/ 6
दरम्यान राज्यात H3N2 बळींची संख्या तीनवर पोहोचली आहे. आधी अहमदरनगर, नंतर नागपूर आणि पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
4/ 6
H3N2 व्हायरस कोरोनासारखाच जीवघेणा ठरणार की काय अशी भीती आता सर्वांना वाटू लागली आहे. पण या व्हायरसपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
5/ 6
नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील प्रिव्हेंटिव्ह हेल्थ डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉक्टर सोनिया रावत यांनी या जीवघेण्या व्हायरसपासून बचावाचे 5 उपाय दिले आहेत. (प्रतीकात्मक फोटो)
6/ 6
संक्रमित लोकांपासून दूर राहा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, बाहेर जाताना मास्क वापरा, आहारात भरपूर द्रव घ्या, पाणी भरपूर प्या, हात सॅनिटाइझ करा किंवा साबणाने धुवा.(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)