दिल्ली, 2 जून: अनेक स्त्रियांचं वजन (Women weight gain) लग्नानंतर (Weight gain After Marriage) वाढतं. लग्नाआधी ज्या मुली सडसडीत बांध्याच्या असतात. लग्नानंतर त्याच बेढब दिसायला लागता. 1 ते 2 वर्षातच शरीर वजनदार झाल्याने महिलांना त्याचं टेन्शन (Tension) यायला लागतं. त्यामुळे बर्याच स्त्रिया डॉक्टरांकडेही जातात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वर्कआउटही (Workout for weight loss) करतात. पण, वजन काही केल्या कमी होत नाही.
तस पाहिलं तर वजन वाढण्याची अनेक कारणं (Weight Gaining Reasons)आहेत. लग्नानंतर स्त्रिया स्वतःकडे कमी आणि कुटुंबाकडे जास्त लक्ष देतात, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे (Family Responsibilities), घरातल्यांच्या जेवणाची काळजी आणि कामं यामुळे त्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात असं बऱ्याच लोकांच मत असतं. तर, काही लोकांच्या मते चांगला जोडीदार मिळाल्यानंतर महिला निर्धास्त होतात आणि त्यांचं वजन वाढायला लागतं. पण, खरंच वजन का वाढतं ? याची कारण आपण जाणून घेऊ या.
(Yoga Guide राग, चिडचिडेपणा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरणारी आसनं)
आहारात बदल
लग्नानंतर, स्त्रिया एका नवीन कुटुंबात, नव्या वातावरणात जातात. तिथल्या जेवणाच्या सवयी वेगळ्या असतात. नवीन कुटुंबातल्या लोकांना चांगलं खाऊ घालण्याच्या नादात स्वत:कडे दुर्लक्ष करत अनहेल्दी आहार घेण्यास सुरवात करतात. माहेरी असताना ज्याप्रकारे स्वत:च्या आहारकडे लक्ष दिलं जात असतं लक्ष द्यायला सासरी जमत नाही.
वाढता तणाव
विवाहाच्या विचाराने महिला जितक्या आनंदी असतात. तितक्याच त्या टेन्शनमध्ये असतात. नवीन जबाबदाऱ्या घेणं, सर्वांना आनंदी ठेवणं यामुळे त्यांना तणाव येत असतो. इतकेच नाही तर, नवीन कुटुंबाची लाईफस्टाईलही बरीच वेगळी असते. जी स्वीकारणं त्यांच्यासाठी एक आव्हान असतं. त्यामुळे हाच ताण कमी करण्यासाठी स्त्रिया अनहेल्दी खातात आणि वजन वाढवत जातं.
(धुम्रपान करणाऱ्यांसाठी जास्त घातक आहे कोरोना, मृत्यूचा 50 टक्के अधिक धोका - WHO)
मेटाबॉलिक रेट कमी
सहसा वयाच्या तिशीनंतर, शरीरात मेटाबॉलिक रेट कमी होण्यास सुरवात होते आणि त्यामुळे थोडंसं खाल्ल्यानंतरही वजन वाढू लागतं. महिलांचं लग्न वयाच्या तिशीच्या आसपास झालं तर, त्यावेळीच शरीरात मेटाबॉलिक रेट घटत असतो. त्यामुळे लग्नानंतर वजन वाढत जातं.
जास्त लाड
लग्न झाल्यावर महिलांचे सासरीही लाड होतात. कुटुंबातील नवीन सदस्य म्हणून त्यांचं कोडकौतुक केलं जातं. लग्नानंतर पहिल्या वर्षभरात नातलगांकडे जाणे, पार्ट्यांना जाणं, कार्यक्रम, सण यामुळे नवीन पदार्थ खाणं होतं राहतं. सर्वच कुटुंबात नवीन सुनेचे लाड होतात. त्यामुळे या काळात महिला निष्काळजी वागतात आणि खाण्यापिण्याची काळजी घेत नाहीत.
(रोज प्या ताक, लस्सी इम्युनिटी, वजन याशिवाय अनेक आहेत Health Benefits)
विचारात बदलत
लग्नापूर्वी मुली सुंदर दिसण्यासाठी नियमित व्यायाम आणि जिम करतात आणि खाण्याचीही काळजी घेतात. पण, लग्नानंतर त्यांचे विचार बदलतात. बर्याचदा त्या स्वत:पेक्षा कुटुंबातल्या सदस्यांची जास्त काळजी घेतात. आता लग्न झालंय त्यामुळे, सुंदर दिसण्याची किंवा फिटनेसची काय गरज? असा विचार त्या करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Weight gain, Women