नवी दिल्ली,06 जुलै: सकाळच्या गडबडीमध्ये पोट भरण्यासाठी नाश्ता (Morning Breakfast) बनवायला वेळ नसेल तर, आपण सोपा पर्याय म्हणून ब्रेड (White Bread side effects) खातो. ब्रेड-बटर, ब्रेड-जाम, ब्रेड सॅन्डविच हे पोट भरण्यासाठी चांगले पर्याय आहेत. ब्रेडमुळे आपलं पोट भरतं मात्र कोणत्याही प्रकारचं पोषण (Nutrition) आपल्या शरीराला मिळत नाही. कधीकधी ऑफिसमध्ये भूक असतानाही खायला वेळ नसेल तर, आपण ब्रेडचे तुकडे तोंडात घालतो. मात्र यातून आपल्या शरीराला किती न्युट्रिशन, व्हिटॅमीन (Vitamins) मिळतात याचा कधी विचार केला आहे का ? हल्ली सगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आपल्याला सहजपणे मिळतात पण, आपण शक्यतो सफेद ब्रेड घरी घेऊन येतो. हा ब्रेडचा प्रकार सगळ्यात जास्त हानिकारक (Harmful) आहे.
सफेद ब्रेड बनवण्याची पद्धत
सफेद ब्रेड बनवण्यासाठी गव्हाच्या पिठात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल ब्लीच (Chemical Bleach) टाकले जातात. ज्यामुळे पीठ सफेद दिसतं, यामध्ये बेंजॉल परॉक्साईड, क्लोरीन डायऑक्साईड आणि पोटॅशियम ब्रोमेट आणि रिफाइंड स्टार्च घातला जातो. जरी या वस्तू फार कमी प्रमाणात वापरल्या जात असल्या तरी देखील ते शरीरात जाणं योग्य नाही.
(ही फळं नियमित खाल्ली तर आजारापासून राहाल दूर; तिसरं फळ तर एन्टीबॉडी वाढवेल)
वजन वाढतं
हेल्दी आणि फिट राहायचं असेल तर सफेड ब्रेड कधीच खाऊ नका. व्हाईट ब्रेड खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढतं. करण्यामध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट घातले जातात. यामुळे ब्लड शुगर देखील वाढते. शरीरात एक्स्ट्रा ग्लुकोज फॅटच्या रूपाने जमा व्हायला लागतं. शुगर लेव्हल जास्त झाल्यामुळे गोड खाण्याची इच्छा व्हायला लागते आणि आपलं वजन वाढायला लागतं.
मूडवर परिणाम
सफेद ब्रेड खाण्यामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण व्हायला लागतात. अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार सफेद ब्रेड खाण्यामुळे पन्नाशीच्या महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रॉब्लेम दिसून आले आहेत. हे ब्रेड खाल्ल्यामुळे थकवा आणि स्ट्रेसची लक्षणं पाहायला मिळाली.
(ताटातील कडीपत्ता काढू नका, महत्त्वाच्या सर्वच आजारांवर आहे गुणकारी औषध)
व्हाईट ब्रेड मधील पोषण तत्व
सगळ्या प्रकारच्या ब्रेडमध्ये कमी कॅलरीज असतात. पण, त्यापासून मिळणारे पोषक तत्व वेगवेगळे असू शकतात. सफेद ब्रेडच्या एका तुकड्यांमध्ये मध्ये 77 कॅलरीज असतात. तर, इंडेक्स जास्त असतं. सफेद ब्रेड बनवण्यासाठी जास्त प्रोसेस केलं जातं. त्यामुळे यातील पौष्टीक घटक संपतात.
(अरे हे काय? महिलेचे कान साफ करताना जे सापडलं ते पाहून डॉक्टरही शॉक)
शुगर लेव्हल वाढते
सफेद ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असतं. ज्यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. डायबिटीसच्या रुग्णांसाठी सफेद ब्रेड खाणं हानिकारक असतं. कारण त्यांच्या शरीरात अचानकपणे शुगर वाढू शकते. सतत ग्लुकोज लेव्हल वाढत राहील्यामुळे हायपरग्लायसेमिक होऊ शकतं. यामुळे हृदयासंबंधी आजार किंवा किडनी फेल होण्याची भीती वाढते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle