मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरे हे काय? महिलेचे कान साफ करताना जे सापडलं ते पाहून डॉक्टरही शॉक

अरे हे काय? महिलेचे कान साफ करताना जे सापडलं ते पाहून डॉक्टरही शॉक

कानातल्या मळाबद्दल ऐकल तरी आपल्याला घाण वाटायला लागते.

कानातल्या मळाबद्दल ऐकल तरी आपल्याला घाण वाटायला लागते.

22 वर्षांनी महिलेने आपले कान स्वच्छ करून घेतले आणि...

  • Published by:  Priya Lad

 मुंबई, 05 जुलै: अनेकदा आपल्या कानात वेदना (Ear pain) होतात, खाज येते किंवा इतर काही समस्या (Ear problem) उद्भवता. आपण डॉक्टरांकडे जातो. सुरुवातीला डॉक्टर काही औषधं देतात. त्यांनीसुद्धा बरं वाटलं नाही तर कान स्वच्छ (Ear cleaning) करून कानाची तपासणीही केली जाते. अशीच एका महिलेनंही डॉक्टरांकडे जाऊन कान (Ear) स्वच्छ करून घेतले, पण तेव्हा तिच्या कानातून जे सापडलं ते पाहून तिच्यासह डॉक्टरही शॉक झाले.

जॉर्डन नावाच्या या महिलेने आपल्या कानाबाबतच्या अनुभव सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला आहे. 22 वर्षांपासून तिने आपल्या कानाची स्वच्छता करून घेतली नव्हती. काही समस्या उद्भवल्याने ती डॉक्टरांकडे गेली आणि तिने आपले कान साफ करून घेतले. डॉक्टरांनी कान स्वच्छ करण्यासाठी तिच्या कानात एक लिक्विड टाकलं आणि लगेच तिच्या कानातून काहीतरी बाहेर पडलं. तिच्या कानातून एक छोटीशी ट्युब बाहेर पडली.

हे वाचा - दररोज आंघोळ केल्याचे मोठे दुष्परिणाम; आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक

जॉर्डनने @dogs_over_ppl  टिकटॉकवर आपला हा व्हिडीओ शेअर काल आहे. हे ट्युब ती चार वर्षांची असताना तिच्या कानात टाकण्यात आली होती. ऐकण्याची समस्या असल्यास ही ट्युब टाकली जाते. ही ट्युब सहा महिन्यांनी आपोआप कानातून बाहेर येते. पण या महिलेच्या बाबतीत तसं झालं नाही आणि तिचे पालक या ट्युबबाबत विसरून गेले आणि तिच्या कानात ही ट्युब तशीच राहिली.

जॉर्डन आता 26 वर्षांची आहे. याचा अर्थ ही ट्युब तिच्या कानात 22 वर्षांपासून तशीच होती. त्याभोवती मळही साचला होता. जॉर्डनलाही याची कल्पना नव्हती. जॉर्डनचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपलाही असाच काही अनुभव शेअर केला आहे.

First published:

Tags: Ear, Health, Lifestyle, Wellness