कडीपत्ता (Curry Leaves) हा भारतीय जेवणातला (Indian Food) महत्वाचा भाग आहे. कडीपत्ता जेवणाची चव वाढवतो आणि आरोग्यवर्धकही आहे. आयुर्वेदात (Ayurveda) कडीपत्त्याच्या पानांचं महत्व सांगितलेलं आहे.
2/ 8
कडीपत्त्याला मुराया कोएनिजी (Murraya Koenigii) म्हटलं जातं. जे रुतासी फॅमिलीचा (Rutaceae) भाग आहे. आयुर्वेदात त्याच्या औषधी गुणधर्मांविषयी सांगण्यात आलं आहे. भारतात जेवणाची चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
3/ 8
कडीपत्त्यात कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक असतात. याच्या पानांमध्ये अल्कलॉईड असतं जे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करतात. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
4/ 8
शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी डायबेटीज पेशंटने कडीपत्याच्या पानांचा वापर करावा. याने हाय ब्लड शुगर लेव्हल कमी होते. डायबेटीज, किडनीचे आजार यात फायदा होतो.
5/ 8
शरीरावर सुज येत असेल तर, कडीपत्ता उपयोगी आहे. कडीपत्त्यात अँनटी-इंफ्लमेटरी गुण असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदद करतात.
6/ 8
वजन कमी करण्यासाठी कडीपत्त्याची पानं चाऊन खाल्ल्याने फायदा होतो. कडीपत्त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पचन क्रिया सुधारते.
7/ 8
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी हाण्यास मदत होते. शरीरात कोलेस्ट्रॉल कमी झाल्यास वजनही कमी होऊ शकतं.
8/ 8
कडीपत्त्यातील कार्बेजोल ऍन्टीबॅक्टेरियल आणि ऍन्टी-इंफ्लमेटरी गुणांमुळे पोटाच्या समस्या कमी होतात. आयुर्वेदानुसार कडीपत्ता पित्त दोष आणि अपचनाची समस्या कमी करतो.