मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हेल्दी लाईफसाठी के जीवनसत्व मोलाचं; कशातून मिळतं आणि फायदे जाणून घ्या

हेल्दी लाईफसाठी के जीवनसत्व मोलाचं; कशातून मिळतं आणि फायदे जाणून घ्या

के जीवनसत्व कशातून मिळतं

के जीवनसत्व कशातून मिळतं

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणं, जखमेतून अधिक रक्तस्राव, महिलांना मासिक पाळीच्या काळात अधिक ब्लीडिंग, लघवीतून रक्त येणं यासारखी लक्षणं आढळतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 10 डिसेंबर : जीवनसत्त्व म्हटलं की आपल्याला लगेच एबीसीडी ध्यानात येते. या एबीसीडीच्या पुढेही जीवनसत्त्वाची गाडी जाते. पण त्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. आणि हे दुर्लक्ष अनेकदा आपल्या तब्येतीसाठी न परवडणारं ठरतं. अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणारं ठरतं. ह्रदय ते मेंदू आणि रक्तापासून ते हाडांपर्यंत अशा सर्वांसाठी या जीवनसत्त्वाची गरज पडते.

जीवनसत्त्व के हे आपल्या चरबीमध्ये मिसळलेलं एक जीवनसत्त्व आहे. शरीरात चरबीच्या रुपाने आतडे आणि यकृतामध्ये या जीवनसत्त्वाचं वास्तव्य असते. हे जीवनसत्त्व आपल्या हाडांना फ्रॅक्चर होण्यापासून म्हणजेचं हाडं तुटण्यापासून आपला बचाव करतं. (vitamin k sources in diet)

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जखम झाल्यास अधिक वेगानं रक्तस्राव होतो आणि ऑस्टियोपोरोसिस हा आजार होण्याचा धोका संभवतो. तसंच के जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणं, जखमेतून अधिक रक्तस्राव, महिलांना मासिक पाळीच्या काळात अधिक ब्लीडिंग, लघवीतून रक्त येणं यासारखी लक्षणं आढळतात. त्यामुळेच आपण जीवनसत्त्व के आपल्या आरोग्यासाठी का गरजेचं आहेत ते बघूया. (vitamin K benefits)

हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक

आपण लहानपणापासून ऐकत आलोय, की हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअमची खूप गरज असते. पण के जीवनसत्त्वामुळेच शरीरात कॅल्शिअम झिरपण्याची प्रक्रिया होते आणि आपली हाडं मजबूत बनतात. आपल्या शरीरात के जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली तर शरीरामध्ये कॅल्शिअम झिरपण्याची प्रक्रिया खंडित होते आणि हाडं कमजोर बनतात.  (vitamin k for healthy brain)

रक्तस्राव रोखण्यात मदत

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, जीवनसत्त्व के शरीरात रक्तस्राव रोखण्याचं काम करते आणि रक्त एकजीव बनवण्याचे काम करते. शरीरात जीवनसत्त्व के ची कमतरता असेल आणि एखादी जखम झाली तर खूप वेगानं रक्तस्राव होतो. रक्तस्राव खूप वेगानं होत असल्याने काहीवेळा तर रूग्णाला रक्त देण्याचीही वेळ येऊ शकते.  (vitamin k for healthy life)

हेही वाचा - कोरोना लशीचा बूस्टर शॉट काय असतो आणि तो का घ्यायलाच हवा?

इन्सुलिनच्या समतोलासाठी फायदेशीर

जीवनसत्त्व के रक्तात इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. एका संशोधनानुसार, जीवनसत्त्व के ची मात्रा घेतल्याने इन्सुलिनचं प्रमाणही वाढतं आणि यातून शुगर नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते.

मासिक पाळी काळात ब्लीडिंग कमी करण्यास मदत

महिलांमध्ये जीवनसत्त्व के ची कमतरता असेल मासिक पाळीच्या काळात त्यांना अधिक रक्तस्रावाचा सामना करावा लागू शकतो. एवढंच नाही तर प्रसुतीच्या काळात ब्लीडिंग रोखण्यातही या जीवनसत्त्वाची खूप महत्त्वाची भूमिका असते.

मेंदूसाठी आवश्यक

के जीवनसत्व मेंदूला अल्झायमर्ससारख्या अनेक गंभीर आजारांपासून वाचवते. या जीवनसत्वामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. यातून मेंदूमधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. एवढंच नाही, यातून मेंदूतील पेशी खराब होण्यापासून बचाव होतो. याशिवाय के जीवनसत्व शरीरातील चयापचयाला प्रोत्साहन देतं.

हे वाचा - Ready To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका;संशोधकांचा धक्कादायक खुलासा

के जीवनसत्वाचे स्रोत

हिरव्या भाज्या, जसं की पालक, चुका, ब्रोकोली, काकडी, पत्तागोभी, मटार आणि बीन्समध्ये के जीवनसत्व भरपूर असतं. याशिवाय अंडे, मासळी, डेअरी प्रॉडक्ट्स, ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल आणि सोयाबीन तेलातही के जीवनसत्व असतं. याला सप्लिमेंट रूपातही घेता येतं. मात्र डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.

First published:

Tags: Brain, Health Tips