मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer: कोरोना लशीचा बूस्टर शॉट काय असतो आणि तो का घ्यायलाच हवा?

Explainer: कोरोना लशीचा बूस्टर शॉट काय असतो आणि तो का घ्यायलाच हवा?

एकीकडे Coronavirus च्या दुसऱ्या लाटेची दहशत आहे तर दुसरीकडे, अनेकांनी लस (Corona Vaccine) घेऊनही त्याचा परिणाम व्हायला वेळ लागत असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे.

एकीकडे Coronavirus च्या दुसऱ्या लाटेची दहशत आहे तर दुसरीकडे, अनेकांनी लस (Corona Vaccine) घेऊनही त्याचा परिणाम व्हायला वेळ लागत असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे.

एकीकडे Coronavirus च्या दुसऱ्या लाटेची दहशत आहे तर दुसरीकडे, अनेकांनी लस (Corona Vaccine) घेऊनही त्याचा परिणाम व्हायला वेळ लागत असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे.

  नवी दिल्ली, 19 मार्च: भारतात कोरोनाचं संक्रमण (Coronavirus latest updates) वाढत आहे. कोरोना साथीची दुसरी लाट (Second wave of coronavirus) आली आहे, अशी चर्चा देशभर सुरू झाली आहे. संसर्ग वाढला तर कडक पावलं (Covid-19 lock-down news) उचलावी लागतील असं राजकीय नेते म्हणत आहेत. वैद्यकीय अधिकारीही नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. युरोपात दुसरी लाट आली त्यानंतर अवस्था बिकटच आहे. तिथं अनेकांनी लस (Corona Vaccine) घेऊनही त्याचा परिणाम व्हायला वेळ लागत असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन डोस पुरेसे नाहीत तर त्यानंतर बूस्टर डोस (Booster shot of corona vaccine) घ्यायला लागेल असंही म्हटलं जातंय.

  गेल्या वर्षात शास्रज्ञांनी कोरोना विषाणूचा अभ्यास करून माहिती तयार केली. जगात पहिल्यांदा असं घडलं की कुठल्याही साथीवरील लस इतक्या कमी वेळात तयार झाली आहे. पण आता शास्रज्ञ त्या लसीच्या परिणामकारकतेबद्दल चिंतेत आहेत. त्याचे परिणाम कधी दिसून येतील हे त्यांना माहीत नाही. या लसीमुळे रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडी लवकरच संपुष्टात येतील त्यामुळे लसीचा बूस्टर डोस तयार करण्याच्या कामाला हे तज्ज्ञ लागले आहेत.

  काय असतो बूस्टर शॉट?

  समजा तुम्ही कॉम्प्युटरचं एखादं सॉफ्टवेअर शिकलात आणि तो कोर्स पूर्ण केल्यानंतर 6 महिन्यांनी त्याच सॉफ्टवेअरमध्ये अधिक चांगल्या सुविधा असलेलं पुढचं व्हर्जन आलं तर तुम्हाला ते शिकून घ्यावं लागतं. अगदी तस्संच सध्या जगात ज्या लशींचे दोन डोस रुग्णांना दिले जात आहेत. त्यांना प्राइम डोस म्हणतात. त्यानंतर एका वर्षात किंवा त्यानंतर कधीही लशीचा आणखी एक डोस घ्यावा लागला तर त्याला बूस्टर डोस म्हटलं जाईल. उदाहरणच द्यायचं झालं तर लहान मुलांना दिलेल्या लशीची परिणामकारता कमी होते आणि शरीरातील अँटिबॉडी कमी होतात त्यावेळी त्यांना बूस्टर डोस दिला जातो.

  Corona Vaccine side Effects : लस घेतल्यानंतर काय होतं? लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

  बूस्टर डोस इम्युनॉलॉजिकल मेमरीवर काम करतो. शरीराला पहिल्या दिलेल्या लसीचा डोस आपली रोगप्रतिकार यंत्रणा लक्षात ठेवते. थोड्या काळानंतर छोटा बूस्टर डोस दिला तर रोगप्रतिकार यंत्रणा लगेच कार्यररत होते आणि अधिक चांगला प्रतिकार करते.

  जसं आपण एकावेळी अति जेवलो तर अपचन होतं त्याऐवजी थोड्या वेळाने थोडं थोडं अन्न घेतलं तर ते योग्य पद्धतीने पचतं. 1960 च्या दशकातील शास्रज्ञांना लसीबाबतही हेच जाणवलं की एकदम लस देण्याऐवजी ती ठराविक अंतराने परत दिली तर शरीरात अँटिबॉडी व्यवस्थित विकसित होऊन प्रतिकार करू शकतात.

  वेगवेगळ्या आजाराच्या लशीचा बूस्टर डोस वेगवेगळ्या अंतराने दिला जातो. काळा खोकला या आजारासाठी लहान मुलांना बूस्टर डोस लगेच काही दिवसांत दिला जातो तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार धनुर्वातासाठी बूस्टर डोस पहिल्या डोसांनंतर 10 वर्षांनी द्यावा.

  बूस्टर डोस देण्याचं दुसरं कारण म्हणजे जर विषाणूने नवं प्रारूप तयार केलं म्हणजे म्युटेशन झालं तर जुना डोस काम करत नाही. अशावेळी जुन्या लशीत बदल करून त्याचा बूस्टर डोस व्यक्तीला दिला जातो त्याला म्युटेड बूस्टर डोस म्हणता येईल.

  आणखी एक प्रकार म्हणजे हेट्रोलॉगस प्राइम बूस्टिंग. यात पहिल्यांदा एका कंपनीची लस दिली जाते आणि बूस्टर देताना वेगळ्या कंपनीची लस दिली जाते. त्यामुळे अँटिबॉडी अधिक प्रभावीपणे काम करू लागतात, असं साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तात म्हटलंय.

  कोरोना लसीकरणात या देशाला मोठं यश; दिली सर्वात पहिली GOOD NEWS

  बूस्टर डोस घेतल्यावर प्रतिकारशक्ती वाढू शकते पण त्याचा दुसरा परिणामही होऊ शकतो. पण याबाबत सध्या संशोधन सुरू आहे. मे 2020 मध्ये इबोला बूस्टर लशीला पहिली हेट्रोलॉगस लस असं संबोधलं गेलं. सध्या कोरोनासाठीही वेगवेगळ्या ब्रँडची लस घेण्यासंबंधी क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. म्हणजे एखाद्यानी फाइजर लस घेतली असेल तर त्याला अस्ट्राझेनेका लशीचा बूस्टर डोस दिला जाईल.

  अर्थात संशोधन सुरू आहे त्यामुळे आधीच बूस्टर डोसबद्दल बोलणं योग्य नाही. जेव्हा ते सिद्ध होईल तेव्हा त्याबद्दल अधिक बोलता येईल.

  First published:

  Tags: Corona vaccine, Coronavirus