नवी दिल्ली, 04 जुलै: एकाच ठिकाणी बसून काम करणं, शरीराची हालचाल कमी असणं, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे काहीजणांना वजन वाढीच्या समस्येचा
(Weight Gain Problem) सामना करवा लागतो. वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं. आजच्या काळात वजन वाढणे
(Weight Gain) ही सर्वसामान्य समस्या बनलेली आहे. स्थूल शरीरामुळे आजारीही येतात आणि आत्मविश्वासावरही
(Confidence) परिणाम होतो. आवडीचे कपडे घालता येत नाहीत.
भविष्यामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी वजन नियंत्रणात
(Weight control) असणं आवश्यक आहे. वजन वाढलं की आपण, अनेक उपाय करायला लागतो. पण केवळ व्यायाम करण्याने वजन कमी होत नसेल तर, काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या रसाचाही उपयोग करू शकता. कडूलिंबाची कडू चव कोणालाच आवडत नाही पण, हा रस आवडत नसला तरी शरीरासाठी खुप फायदेशीर आहे इतर आजारांबरोबर वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो.
(हे वाचा- गर्भवती महिलांनी घरातली ‘ही’ कामं करूच नयेत; वाढतील Complications)
कडुलिंब शरीरातील पोषकद्रव्य शोषण्याचे काम करतं आणि शरीरात जमा होणारी चरबी जाळतं. याशिवाय पचन सुधारून वजन नियंत्रित करण्यास मदत करतं.
वेटलॉससाठी कडुलिंबाचा रस
कडुलिंबाचा रस तयार करण्यासाठी आधी 15 ते 20 कडूलिंबाची पाने घ्या. ही पाने पाण्याने धुवा. यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी आणि ही पानं घाला. बारीक वाटा. हा रस गाळून घ्या. रोज एक ग्लास रस प्यायल्यास. हळूहळू फरक दिसू लागेल.
(हे वाचा- तुमच्या शरीरात रक्त कमी आहे, कसं ओळखाल; लक्षणं दिसताच सुरू करा 'हे' उपाय)
कडुलिंबाचा रस वजन कमी करण्यास कशी मदत करतो ते जाणून घ्या.
पोट भरलेलं राहतं
कडुलिंबाच्या रसात फायबर असतं कडुलिंबाचा रस पिण्याने पचन प्रक्रिया संथ गतीने होते आणि पोट बराच काळ भरलेलं राहतं. लवकर भूक न लागल्याने शरीरात साठलेली चरबी आपोआप वितळून जाते.
आतून शरीर स्वच्छ करते
कडुलिंबाच्या औषधी गुणांमुळे शरीर आतून साफ करण्यास मदत होते. शरीरातील सगळे विषारी घटक काढून टाकले जातात. शरीरावरील सुज आणि वजन वाढवण्यास कारणीभूत ठरणारे सगळे घटक कमी करण्यात मदत करतं.
(हे वाचा- सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? घरगुती 6 उपाय)
मेटाबॉलिजम सुधारतं
मेटाबॉलिझम कमी झालं की वजन वाढायला लागतं. मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी कडुलिंबाचा रस देखील फायदेशीर आहे. कडुलिंबामध्ये बरेच ऍन्टी-ऑक्सिडंट्स असतात. शरीरातल्या अतिरिक्त कॅलरी कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.