नवी दिल्ली ,04 जुलै: गर्भावस्थेत महिलांनी**(Pregnant Women)**काही घरगुती कामं (Household Work) करणं किंवा हलकी कामं करणं योग्य मानलं जातं. पण, काही कामं या काळात न करणंच चांगलं मानलं जातं. प्रेग्नेन्सीत महिलांचं वजन खुपचं वाढतं (Weight Gain)****. त्याच वेळी, वजन वाढल्यामुळे त्यांना बर्याच समस्याचा (Problems) सामाना करावा लागतो. त्यामुळे या अवस्थेत काही गोष्टी करणे टाळावं. त्याबरोबर घरगुती कामं करणं किंवा हलकी कामं करणं योग्य मानलं जातं.मात्र काही कामं टाळणंच चांगलं असतं. प्रेग्नेन्सीत कोणत्या गोष्टींपासून दूर रहावं हे जाणून घेणं फार महत्वाच आहे. महिलांचं आरोग्य चांगलं रहावं आणि कोणतेही कॉम्प्लीकेशन्स (Complications) होऊ नयेत यासाठी ही माहिती वाचा. केमिकलयुक्त पदार्थांपासून अंतर राखा सामान्यपणे घरात साफसफाई करताना वापरल्या जाणार्या उत्पादनांच्या परिणामांविषयी फारशी माहिती नसते. म्हणून गर्भधारणेच्या काळात साफसफाई करताना जास्त काळजी घेणं चांगलं. यासाठी, केमिकलयुक्त पदार्थांवरील (Chemical Product) लेबलंवर काही वॉर्निंग देलेल्या असतील तर, अशा उत्पादनांचा वापर कमी करा. त्याऐवजी आपण नॅचरल उत्पादने निवडा या पदार्थात घातक केमिकल कमी असतात. शिवाय केमिकलयुक्त पदार्थ वापरतांना हॅन्डग्लोज वापरा आणि उत्पादनांवर लिहीलेल्या सूचनांचं अनुकरण करा. ( मुलींच्या शर्टला का नसतो खिसा? तुम्हालाही पडला असेल हा प्रश्न तर वाचा.. ) जास्त काळ उभं रहाणं टाळा बराचवेळ उभं राहून करावी लागणारी कामं टाळा. स्वयंपाकघरच्या ओट्यावर भाज्या आणि फळं कापण्यापेक्षा टेबलचा वापर करून खुर्चीत बसून कापा. म्हणजे जास्त वेळ उभं राहणावं लागणार नाही. त्यामुळे वारंवार उठबस करावी लागणार नाही. स्वयंपाक करताना ब्रेक घेत रहा. बर्याच वेळ उभं राहू नका. सोपे पदार्थ करा म्हणजे तयार करण्यासाठी बर्यावेळा गॅसजवळ उभं राहवं लागणार नाही. ( प्रेग्नंट महिलांना कशी घेता येईल कोरोना लस? मोदी सरकारने दिले दोन मार्ग ) जड वस्तू उचलणं टाळा गर्भधारणेदरम्यान जड वस्तू उचलणं चांगले नाही. डॉक्टरसुद्धा गर्भवती महिलांना अवजड वस्तू उचलणं टाळण्याचा सल्ला देतात. म्हणून प्रेग्नेन्ट असताना अवजड वस्तू उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणं चांगलं. किती वजन उचलू शकतो हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येतो. ( पुरुषांनो, तुम्हाला Breast Cancer तर नाही ना? ही 4 लक्षणं वेळीच ओळखा ) घरातील काही कामं करू शकता गरोदरपणात उभं राहण्यापेक्षा बसून भाज्या कापा. सोपी घरगुती कामं किंवा भांडीधुण्याची कामदेखील करता येतात. पण जास्त वेळ उभं राहू नका.याशिवाय कोणताही त्रास नसल्यास लांब हॅन्डलचा झाडू आणि मॉप वापरुन घर स्वच्छ करू शकता. पण जास्त वाकू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.