मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

योनी संसर्गात हे औषध ठरतं परिणामकारक; पहा कसा होतो फायदा

योनी संसर्गात हे औषध ठरतं परिणामकारक; पहा कसा होतो फायदा

वजायनल इन्बॅन्स झाल्यास योनीतून खराब वास यायला लागतो

वजायनल इन्बॅन्स झाल्यास योनीतून खराब वास यायला लागतो

तज्ज्ञांच्यामते योनिमार्गात संसर्ग (Infection) झाला असेल तर, महिलांना फार त्रास होतो. नेमके उपचार कसे करावेत हे देखील कळत नाही.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली,29 जुलै : प्रोबियोटिक्सचा (Probiotics) वापर आता खुप लोकप्रिय होत आहे. कोणत्याही प्रकारचा संसर्ग (Infection) टाळण्यासाठी याचा वापर केला जात आहे. खास करुन पचन व्यवस्था (Digestion) चांगली ठेवण्यासाठी हे वापरलं जातं. तस पाहिल तंर, प्रोबायोटिक्स हे हेल्दी बॅक्टेरिया (Healthy Bacteria) कॅरी करतात त्यामुळे आपलं जीवाणूंपासून संरक्षण होतं. तज्ज्ञांच्या मते प्रोबायोटिक्स केवळ आपल्या पोटासाठीच नाही तर, योनीसाठी (vagina) देखील खुप फायदेशीर असल्याचं सिद्ध होत आहे. शास्त्रज्ञांच्यामते याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आणखीन संशोधनाची (Research) आवश्यकता आहे. PH लेव्हल बॅलन्स न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या हेल्थ सायन्स विभागाच्या डॉ. मिंडी हार्ड यांच्यामते, गेल्या काही वर्षांत यासंदर्भात आश्वाक असं संशोधन केलं गेलं आहे. प्रोबायोटिक्स PH लेव्हल बॅलन्स बिघडला असेतर तो ठिक करण्यात आणि उपचार करण्यास खुप प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. (महिलांसाठी केळं आहे वरदान; पहा दररोज खाण्याचे फायदे) कसं काम करतं? खरं तर, योनीमध्ये जवळजवळ 50 प्रकारचे मायक्राब्‍स म्हणजे सुक्ष्मजंतू असतात ते बऱ्यापैकी बाह्य संसर्गापासून बचाव करण्यात आणि योनी निरोगी ठेवण्यासाठी काम करतात. अशा परिस्थितीत जेव्हा असुरक्षित संभोग,हार्मोनल चेन्ज, मासीक पाळी, अस्वच्छतां अशा परिस्थितीत मायक्राब्‍स सक्रिय होतात आणि योनीला संरक्षण देतात. (वेळीच ओळखा ‘Torch Infection’चा धोका; गर्भाच्या वाढीवर होतो भयंकर परिणाम) वजायनल इन्बॅन्स म्हणजे काय? वजायनल इन्बॅन्स झाल्यास योनीतून खराब वास यायला लागतो, स्त्राव येणं,  खाज सुटणे असे त्रास होतात. हे बॅक्‍टीरियल इन्फेक्‍शन,यीस्‍ट इन्फेक्‍शन आणि यूटीआय इन्फेक्शनची लक्षणं आहेत. (सकाळचा भात संध्याकाळी खात असाल तर आधी हे वाचा शिळ्या भाताचे दुष्परिणाम) तज्ज्ञांचा सल्ला तज्ज्ञांच्या मते योनिमार्गाचा PH बॅलन्स ठेवण्यासाठी आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात दही किंवा प्रोबियटिक्स कॅप्सूलचा समावेश केला पाहिजे. 1996 साली करण्यात आलेल्या संशोधनानुसार ज्या महिलांनी आपल्या आहारात जास्त प्रोबायोटिक्स घेतले त्यांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला नाही.प्रोबियटिक्स काही प्रमाणात यामध्ये फायदेशीर ठरू शकतात.मात्रा योगीच्या संसर्गात फक्त प्रोबायोटिक्स घेण्यानेच फायदा होतो असं नाही तर, स्वच्छताही महत्वाची आहे.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Sexual health

पुढील बातम्या