
गर्भावस्थेच्या काळात महिलांना स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची प्रचंड काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्याच्या सवयी पासून झोपेपर्यंत सगळ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. चुकीच्या पद्धतीचा आहार, अतिरिक्त ताण, धावपळ अशा कितीतरी प्रकारच्या गोष्टींचा साईड इफेक्ट हा बाळावर बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

या काळामध्ये महिलांना अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात. यापैकीच एक आहे ‘टॉर्च इन्फेक्शन’. या इन्फेक्शनमुळे गर्भावर गंभीर परिणाम होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या 5 आजारांना टॉर्च इन्फेक्शन म्हटलं जातं. याचे परिणाम इतके वाईट असतात की, बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं.

टॉक्सोप्लाजमॉसिस हे इन्फेक्शन टॉक्सॉप्लाज्म गोंडाई या परजीवींमुळे होतं. हे इन्फेक्शन तोंडाद्वारे प्लेसेन्टामधून बाळाच्या शरीरापर्यंत पोहचतं. कच्च मीठ खाल्ल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.

एचआयव्ही, हेपेटाइटिस बी, चिकन पॉक्स, सिफलिस आणि क्लाइमॅडिया यासारखे संसर्ग देखील बाळाला होऊ शकतात. सिफलिस बॅक्टेरियामुळे बाळाच्या विकासामध्ये अडचणी येतात.

रूबेला या इन्फेक्शनला जर्मन फिवर देखील म्हटलं जातं. हा त्रास झाल्यावर घसा खवखवणे, रॅशेस आणि थोडासा ताप येतो.

साइटोमेगालॉ इनफेक्शनचा त्रास सीएमबी हर्पीस नावाच्या वायरस पासून होतो. यामध्ये कावीळ होणे, ऐकतांना अडचण येणे, फुप्फुसाला त्रास होणे, स्नायू कमजोर होणे अशी लक्षणं दिसतात.

हर्पीस सिम्पलेक्स व्हायरस 2 या इन्फेक्शनमध्ये प्रायव्हेट पार्ट जवळ रॅशेस येतात. या इन्फेक्शन्समुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतो.

टोर्च इन्फेक्शनमुळे जन्मताच काही विकार होऊ शकतात. अंधत्व येणे, ऐकू कमी येणे किंवा लहान वयातच डायबिटीस होण्यासारखे त्रास होऊ शकतात. प्रेग्नेंसीमध्ये 11 ते 20व्या आठवड्यापर्यंत टोर्च इन्फेक्शनचा धोका असतो.

टॉक्सोप्लाजमॉसिस सुरुवातीच्या काळातच लक्षात आला तर पाइरिमॅथामिन आणि सल्फरडायजिन पॅथॉजीन बाळापर्यंत जाण्यापासून रोखता येऊ शकतं.

हार्पिस सिंपलेक्स व्हायरसच्या धोक्यामुळे सिजेरियन डिलीवरी करावी लागते अशा वेळेस वेळीच लक्षणं लक्षात आली तर अँटिव्हायरस देता येऊ शकतात.




