मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कमाल! वजन कमी करण्यासाठी तोंडाला, नव्हे दातांना लावा खरोखरचं कुलूप!

कमाल! वजन कमी करण्यासाठी तोंडाला, नव्हे दातांना लावा खरोखरचं कुलूप!

सोशल मीडियावर लोकांनी या डिव्हीईसला टॉर्चर डिव्हाईस म्हटलं आहे.

सोशल मीडियावर लोकांनी या डिव्हीईसला टॉर्चर डिव्हाईस म्हटलं आहे.

एखाद्याची बडबड किंवा अति खाणं बंद करण्यासाठी तोंडाला कुलूप (Lock) लावं असं आपण बोलतो. पण, वजन कमी (Weight loss) करण्यासाठी तोंडाला कुलूप लावल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?

दिल्ली,09 जुलै:  वजन कमी (Weight loss)  करण्याचा प्रत्येक प्रयत्न फसला असेल तर, आता दु:ख करत बसू नका. तोंडाला जरा आवर घाल, तोंडाला कुलूप लाव हे आपण वजन कमी करू इच्छिणारी व्यक्त असाल तर स्वतःला बजावत असाल. काहींना हा सल्लाही मिळाला असेल. या वाक्यातलं कुलूप प्रतिकात्मक असलं तरी वजन कमी करण्यासाठी खरोखरचं कुलूप लावणारं डिव्हाइस आलं आहे.

त्वरित वजन कमी करण्यासाठी  हे डिव्हाईस (Dental Slim Diet Control) बाजारात देखील आलं आहे. 2 आठवड्यात 6 किलो वजन कमी करण्याचा दावा करणारं हे यंत्रं वापरणं सोपं नाही. कारण यात तोंडाला नाही तर दातांना कुलूप बसवणं आवश्यक आहे.

लठ्ठपणा ( Obesity Problem) ज्यांच्यासाठी एक मोठी समस्या बनलेली आहे. त्यांच्यासाठी आतापर्यंत शस्त्रक्रिया हाच शेवटचा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. पण, आता संशोधकांनी (Scientist) असं उपकरण (Dental Slim Diet Control) तयार केले आहे. ज्यामुळे आपल्याला शस्त्रक्रियेशिवाय वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. हे वजन कमी करणारं डिव्हाईस (Weight Loss Device) आपल्या दातांवर कुलूप लावतं.

Dental Slim Diet Control नावाचं हे उपकरण न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठाने तयार केलं आहे. डिव्हाईस आपल्या दातामध्ये घट्ट बसवलं जातं. त्यामुळे त्या व्यक्तीला केवळ लिक्विडच घेता येतं. कोणत्याही प्रकारचं अन्न चावता येत नाही.

(हात आहे की हातोडा! फक्त कोपराने एका मिनिटात धडाधड फोडले 279 अक्रोड; पाहा VIDEO)

डिव्हाइस कसे का करत?

डिव्हाइस (Dental Slim Diet Control) त्या व्यक्तीच्या वरच्या आणि खालच्या दातांना जोडलेलं असतं. हे एक मैग्नेटिक कॉन्ट्रॅप्शन आहे,जे बेल्टच्या मदतीने दातात अडकलेलं असतं. यामुळे,एखादी व्यक्ती 2 मिमीपेक्षा जास्त जबडा उघडत नाही. मात्र असा दावा करण्यात आला आहे की, डिव्हाईस लावणाऱ्याला बोलण्यात आणि श्वास घेण्यात अडचण येत नाही.

(तुम्हाला तुमच्या पूर्वजन्माचं रहस्य जाणून घ्यायचं आहे?, मग ही बातमी वाचा)

2 आठवड्याच 6 किलो वजन कमी जेव्हा या डिव्हाइसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. केवळ 2 आठवड्यातच लोकांचं वजन 6.36 किलोपर्यंत कमी झालं. Dental Slim Diet Control तयार करणारे प्रोफेसर पॉल ब्रंटन (Professor Paul Brunton) यांच्यामते, की डेंटीस्ट हे डिव्हाईस वापरु शकतात आणि गरज पडली तर, काढून पुन्हा लाऊ शकतात.

(अरे हे काय? महिलेचे कान साफ करताना जे सापडलं ते पाहून डॉक्टरही शॉक)

लठ्ठपणामुळे वाढलेली चरबी काढण्याकरता शस्त्रक्रिया करण्यापेक्षा हा एक स्वस्त आणि चांगला पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही असा दावा केला जात आहे.

टॉर्चर डिव्हाईस

सोशल मीडियावर लोकांनी या डिव्हीईसला टॉर्चर डिव्हाईस म्हटलं आहे. एका व्यक्तीने तर हे रिसर्च डिलीट करण्याची मागणी केली. तर काहींनी हे डिव्हाईस लावल्यावर लोकांना दातही घासता येणार नाहीत असं सांगितलंय.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Weight gain, Weight loss