मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /शिजवलेल्या अन्नासोबत कच्ची काकडी का खाऊ नये? जाणून घ्या

शिजवलेल्या अन्नासोबत कच्ची काकडी का खाऊ नये? जाणून घ्या

 सगळ्या ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने व शरीराला थंडावा देणारी असल्यानेही काकडीला जास्त पसंती मिळते; मात्र आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अलका विजयन यांच्या म्हणण्यानुसार, रोजच्या जेवणासोबत कच्ची काकडी खाऊ नये.

सगळ्या ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने व शरीराला थंडावा देणारी असल्यानेही काकडीला जास्त पसंती मिळते; मात्र आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अलका विजयन यांच्या म्हणण्यानुसार, रोजच्या जेवणासोबत कच्ची काकडी खाऊ नये.

सगळ्या ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने व शरीराला थंडावा देणारी असल्यानेही काकडीला जास्त पसंती मिळते; मात्र आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अलका विजयन यांच्या म्हणण्यानुसार, रोजच्या जेवणासोबत कच्ची काकडी खाऊ नये.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई , 26 नोव्हेंबर : भरपूर पाणी व फायबर्स असलेली काकडी वेट लॉस करणाऱ्यांना, फिटनेससाठी प्रयत्न करणाऱ्या अशा सगळ्यांना आवडते. सगळ्या ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने व शरीराला थंडावा देणारी असल्यानेही काकडीला जास्त पसंती मिळते; मात्र आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अलका विजयन यांच्या म्हणण्यानुसार, रोजच्या जेवणासोबत कच्ची काकडी खाऊ नये. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी आपण जेवणासोबत काकडीचं सेवन करत नसल्याचं व रुग्णांनाही तसं न करण्याचा सल्ला देत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  शिजवलेल्या अन्नासोबत काकडी का खाऊ नये, याबाबत आयुर्वेद तज्ज्ञ अलका विजयन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्टीकरण दिलंय. शिजवलेल्या अन्नासोबत कच्ची काकडी खाल्ल्याने पचन मंदावतं. कच्चं आणि शिजवलेलं अन्न पचवण्यासाठी शरीराला वेगवेगळा वेळ लागतो. शिजवलेल्या अन्नाला उष्णता दिल्यामुळे त्यावर आधीच प्रक्रिया झालेली असते. त्यामुळे त्यातून आम तयार होतो. आयुर्वेदानुसार आम हा घटक शरीरातल्या दुखण्यासाठी कारणीभूत असतो.

  हेही वाचा - हिरवी मिरची आरोग्यासाठी ठरू शकते वरदान; फक्त जाणून घ्या खाण्याचे योग्य प्रमाण

  याबाबत आहारतज्ज्ञ स्वाती बठवाल यांनी सांगितलं, की “वजन कमी करण्यासाठी काकडी उत्तम असते. काकडीत भरपूर पाणी असतं. काकडीच्या बियांमुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. फायबर्स आणि पाणी यामुळे शरीराला आराम मिळतो; मात्र शिजवलेल्या अन्नासोबत काकडी खाणं काही जणांना सोसत नाही. काकडीतल्या कुकुर्बिटासिन या घटकामुळे काकडी पचायला अवघड ठरू शकते. त्यामुळे काकडी नेहमी स्वच्छ धुवून सालीसह खावी.”

  काकडीतल्या कुकुर्बिटासिन या घटकामुळे तिला कडवट चव मिळते. पचनशक्ती चांगली नसणाऱ्यांना याच कारणामुळे काकडी पचवणं कठीण वाटू शकतं. त्याचं कारण काकडी खाल्ल्यानंतर त्यांना गॅसेस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो, असं 'अर्बन प्लॅटर'मधल्या आहारतज्ज्ञ रीमा किंजळकर यांचं म्हणणं आहे.

  कुकुर्बिटासिन काकडीच्या टोकाकडच्या भागांमध्ये प्रामुख्यानं एकवटलेलं असतं. काकडीची टोकं कापून ती घासून त्यावर मीठ टाकल्यास पांढरा चिकट द्रव निघतो. त्यातून काकडीचा कडवटपणा कमी होतो. काकडीची टोकं काढून टाकली, तरी तो कडवटपणा काकडीत उतरण्याची शक्यता कमी होते, असं रीमा यांनी सांगितलं.

  “काकडी थंड, भरपूर पाणी असलेली आणि पचायला हलकी असते. काकडीच्या नियमित सेवनानं शरीरातला वाताचा समतोल बिघडतो व पोट फुगणं, बद्धकोष्ठता, कोरडे केस असे परिणाम दिसतात,” असं डॉक्टर अलका यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काकडी सॅलड म्हणून खावी, पण जेवण म्हणूनच ती आहारात घ्यावी. विशेषतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी उष्णतेचं शमन करण्याच्या दृष्टीने काकडी उपयुक्त असते. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काकडीवर मीठ, मिरपूड आणि तीळ घालून खावं. त्यामुळे गॅसेस होणार नाहीत. तसंच कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्यांसोबत काकडी खावी असा सल्ला डॉ. अलका यांनी दिला आहे.

  आहारतज्ज्ञ रीमा यांनी काकडी खाण्याचे काही फायदे सांगितले आहेत. काकडीमधल्या के जीवनसत्त्वामुळे हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो. हाडांच्या विकासात के जीवनसत्त्व महत्त्वाचं असतं. यकृतात रक्तस्राव होण्याचा धोकाही यामुळे कमी होतो. कॅल्शियम शोषण्यासाठीही के जीवनसत्त्व शरीराला आवश्यक असतं. काकडीतलं भरपूर पाणी व फायबर्समुळे शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर पडण्यास मदत मिळते. पचन सुधारतं. तसंच फायबर्समुळे साखर कमी शोषली जाते व चरबीही कमी होते. त्यामुळे अचानक साखर वाढण्याचा धोका काकडीच्या सेवनानं कमी होतो. काकडीतल्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. फायबर्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी मर्यादित राहून हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

  स्वयंपाकात अनेक पदार्थांमध्ये काकडीचा वापर केला जातो; मात्र काकडी सॅलडच्या स्वरूपात कच्ची खाण्याला अधिक पसंती असते. तशी ती खावीही; मात्र शिजवलेल्या अन्नासोबत कच्ची काकडी खाणं काही जणांना पचायला जड जाऊ शकतं. त्यासाठी सॅलड म्हणून काकडीचा वापर करून संपूर्ण जेवण म्हणूनच ते खावं असं तज्ज्ञ सांगतात.

  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle