मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /‘नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल’ किती असते? कसा ओळखायचा धोका?

‘नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल’ किती असते? कसा ओळखायचा धोका?

डायबेटिज मुळे अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

डायबेटिज मुळे अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

मधुमेहामुळे (Diabetes) हृदय, डोळे आणि किडनी या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम(Effect) होतो. त्यामुळे शरीरात साखरेची पातळी किती असावी माहिती असायला हवं.

नवी दिल्ली,07 जुलै : आपल्याच देशात नाही तर, जगभरात डायबेटीज (Diabetes) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढव होते आहे. डायबेटिज (Diabetes)हा असा आजार आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम (Body Effect) होतं. या एका आजाराने अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. डायबेटीजच्या रुग्णाना औषधांबरोबर (Medicine) बरीच पथ्यही पाळावी लागतात. या रूग्णांना त्यांच्या आहाराची (Diet) खूप काळजी घ्यावी लागते.

आजच्या काळात मधुमेह एक गंभीर समस्या (Problem) बनली आहे. मधुमेह कधीच पूर्णपणे बरा करणं शक्य नाही पण, नियंत्रणात (Control) ठेवला जाऊ शकतो. या आजारात शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागेल. नॉर्मल ब्लड शुगरचं प्रमाणच माहिती नसल्यामुळे आपण खुपदा दुर्लक्ष करतो मात्र, एका ठराविक वयानंतर ब्लड शुगर चेक करत राहण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. निरोगी राहण्यासाठी ब्लड शुगर लेव्हल किती असायला हवं हे माहिती असणे आवश्यक आहे. जनसत्तामध्ये यासंर्भात माहिती देण्यात आली आहे.

(कोरोना काळात वाढाला ताण; विद्यार्थांसाठी स्ट्रेस कमी करणारे उपाय)

ब्लड शुगर म्हणजे काय?

शरीराला ग्लुकोजमुळे ऊर्जा मिळत असेते. जेव्हा ग्लुकोज शरीरामध्ये जमायला लागतं. तेव्हा त्याला ब्लड शुगर म्हटलं जातं. कार्बोहाइड्रेट मधून शरीर ग्लुकोज निर्मिती करतं. कार्बोहायड्रेट बरोबर प्रोटीन आणि फॅट्स देखील ग्लुकोज तयार करण्यात मदत करतात. प्रोटीनपासून तयार होणारे ग्लुकोज लिव्हरमध्ये स्टोअर केले जातात.

रुग्णांनी केव्हा करावी तपासणी?

आरोग्य तज्ञांच्यामते, ब्लड शुगर लेव्हल तपासणी 3 पद्धतीने करता येऊ शकते. सकाळी जेवण घेण्याआधी, जेवल्यानंतर एक-दोन तासांनी किंवा रात्री अंथरुणालामध्ये झोपायला जाताना.

(घरगुती उपाय जरूर करा; पण 'या' गोष्टी लक्षात ठेवा! होणार नाहीत Side Effects)

नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल

ज्यांना मधुमेहाचा (Diabetes)त्रास नाही ही त्यांच्यामधील उपाशापोटी ब्लड शुगर लेव्हल 70 ते 99 मिलीग्राम/डीएल मध्ये असावी लागते. तर पोस्ट प्रोडियल हेल्दी शुगर लेव्हल 140 मिलीग्राम/डीएल पेक्षा कमी असावी. त्यालाच नॉर्मल लेव्हल म्हणता येऊ शकतं.

वयानुसार ब्लड शुगर लेवल

6 वर्षांच्या छोट्या मुलाचं फास्टिंग शुगर लेवल 80 ते 180 मिलीग्राम/डीएलच्या मध्ये असायला हवं. जेवणाआधी ते 90 ते 180 मिलीग्राम/डीएल असू शकतं. पोस्ट प्रोडियल शुगर लेव्हल 140 मिलीग्राम/डीएल असायला हवं किंवा रात्री 100 ते 180 मिलीग्राम/डीएल असू शकतं.

(आश्चर्य! कोरोना लस घेतल्यानंतर डोळ्यांची दृष्टी परत आली; आजींनी केला दावा)

13 ते 19 वर्षाच्या व्यक्तींमध्ये नॉर्मल फास्टिंग शुगर लेव्हल 70 ते 150 मिलीग्राम/डीएल असतं. जेवणाआधी 90 ते 120 मिलीग्राम/डीएलपर्यंत शुगर लेव्हल असायला हवी आणि जेवणानंतर 2 तासांनी ब्लड शुगर लेवल 140 मिलीग्राम/डीएल पेक्षा कमी असायला हवी. याशिवाय बेड टाईममध्ये ब्लड शुगर लेवल 90 ते 150 मिलीग्राम/डीएल असावी.

20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ब्लड शुगर फास्टिंग 100 मिलीग्राम/डीएल पेक्षा कमी असायला हवी तर, जेवणाआधी ब्लड शुगर लेव्हल 70 ते 130 मिलीग्राम/डीएलमध्ये असावी. याशिवाय जेवणानंतर 2 तासांनी 180 पेक्षा कमी मिलीग्राम/डीएल असावी लागते. झोपताना 100 ते 140 मिलीग्राम/डीएलमध्ये असावी.

(अतिशय घातक आहेत ही Food Combinations; आयुर्वेदानुसार पाहा काय होतो परिणाम?)

65 वयाच्या लोकांमध्ये फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 90 ते 130 मिलीग्राम/डीएल यांच्यामध्ये  तर,  बेड टाईमच्या वेळी ब्लड शुगर लेव्हल 150 मिलीग्राम/डीएल पेक्षा अधिक असू नये. डायबेटीस लाईफस्‍टाईल बदलून आणि मेडिकेशन करून कंट्रोल करता येतो. काही घरगुतीही टाइप 2 डायबिटीसमध्ये उपयोगी पडतात.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle