नवी दिल्ली, 16 जून : कोरोना आपली रूपं (Corona variants) बदलतो आहे. कोरोनाचे बरेच व्हेरिएंट्स (Covid variants) समोर आले आहेत. पण आता या प्रत्येक व्हेरिएंटवर भारताकडे मोठं हत्यार आहे. कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारी पडेल, असं औषध (Corona medicine) भारताकडे आहे आणि हे औषध म्हणजे. 2 डीजी (2-DG Drugs). हे औषध कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर प्रभावी असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे.
कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी तयार करण्यात आलेलं 2डीजी औषध, कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सशी लढण्यास सक्षम आहे. हे औषध कोरोनाच्या व्हेरिएंट्सला रोखतं, तसं व्हायरसची प्रतिकृती तयार होणंही कमी होतं, असा दावा संशोधकांनी केला आहे.
कोरोनाच्या प्रभावाचा अभ्यास फक्त दोन व्हेरिएंट्सवर करण्यात आला आहे. पण यातील अँटिव्हायरल गुण कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर प्रभावी ठरले आहेत, असा दावा संशोधकांनी केल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे.
हे वाचा - खरं की खोटं? Covaxin साठी गाईच्या सीरमचा वापर?
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) शास्त्रज्ञांनी डॉ. रेड्डीज लॅबच्या (Dr.Reddy’s Lab) सहकार्याने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज म्हणजे 2DG औषध तयार केलं आहे. हे औषध डीआरडीओच्या लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सने (INMAS) डॉ. रेड्डीज लॅब सोबत मिळून तयार केलं आहे. या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) 8 मे रोजी या औषधाच्या तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे. त्यानंतर DCGI ने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 17 मे रोजी हे औषध लाँच केलं होतं.
हे वाचा - कसं, कुणी आणि कधी घ्यावं 2DG? कोरोना औषधाबाबत जरूर वाचा DRDO च्या मार्गदर्शक सूचना
हे औषध रुग्णालयात दाखल रुग्णांना लवकर बरं होण्यास मदत करतं. तसंच रुग्णाचं कृत्रिम ऑक्सिजनवरील अवलंबित्व संपावं यासाठी औषध फायदेशीर असल्याचा दावा सरकारने केला आहे. क्लिनिकल ट्रायलच्या (clinical trial) निकालानुसार या औषधामुळे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण लवकर बरे झालेत. तसंच हे औषध दिल्यानंतर रुग्णांना फार काळ कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून रहावं लागलं नाही. 2DG देण्यात आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR TEST) निगेटीव्ह आली. हे औषध विषाणुची लागण झालेल्या पेशींमध्ये जमा होतं आणि विषाणुला पसरण्यापासून ऱोखतं. तसेच रुग्णाची शक्तीदेखील वाढते, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Health