दिल्ली,16 जून : संपूर्ण जगाने योगाचं महत्व (Important of Yoga) ओळखलेलं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटीसुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात योगासनांनी करतात. सर्वांची लाडकी अभिनेत्री माधूरी दीक्षित-नेने (Madhuri Dixit Nene) यासुद्धा आपल्या फॅन्ससाठी योगासनं, वर्काऊट, आहार याचं महत्व सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सांगत असतात. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी (International Yoga Day) आपल्या चाहत्यांना विविध योगासनं शिकवण्यासाठी काही व्हीडिओ (Video)तयार केले आहेत. त्यातला पहिला व्हीडिओ त्यांनी इन्स्टग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.
दरवर्षी 21 जूनला जागतिक योग दिन (World Yoga Day) साजरा केला जातो. कोरोनामुळे सध्या योग दिवस आपल्या घरातच साजरा करण्याची वेळ आली असली तरी, आपण घरातचं राहून काही सोपी योगासन करून हा दिवस साजरा करू शकतो असा संदेश त्यांनी दिला आहे.
View this post on Instagram
आजपासून त्यांनी योगासनांची एक सीरीज सुरू केली आहे. त्यात पहिलं आसन भुजंगासन (Bhujangasan) आहे. माधुरी दीक्षित यांनी भुजंगासन करतानाचा व्हीडिओ पोस्ट करत त्यासोबत त्याचे फायदेही सांगितले आहेत. भुजंगासन सूर्यनमस्कारातही केलं जातं. यामुळे पोटाचे, पाठीचे आणि खांद्याचे स्नायू बळकट होतात. शरीरात रक्तप्रवाह सुधारतो. थकवा कमी होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Madhuri dixit, Yoga, Yoga day