Home /News /lifestyle /

जेवल्यानंतर चहा पिण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम; आजच सवय बंद करा

जेवल्यानंतर चहा पिण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम; आजच सवय बंद करा

संध्याकाळी जास्त उशिरा चहा पिऊ नये.

संध्याकाळी जास्त उशिरा चहा पिऊ नये.

जेवल्यानंतर लगेच चहा घेण्याची पद्धत अतिशय वाईट आहे. त्यामुळे शरीरात पोषक घटकांचे शोषण होत नाही.

    नवी दिल्ली, 17 जुलै :  आपल्या सगळ्यांना  थकवा घालवण्यासाठी प्यावसं वाटणारं प्येय्य म्हणजे चहा (Tea), चहा प्यायल्याने तरतरी (Freshness) येते. कहीजण तर, चहाशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांच्या दिवसाची सुरवातच चहाने होते. तर, संध्याकाळी थकवा जाण्यासाठी चहा घेतल जातो. चहा हे सगळ्यांचं आवडीचे प्येय आहे. कधी कधी काही पदार्थ खात असताना त्यासोबत चहा प्यायला ही आपल्या आवडतं मात्र, काही खाल्ल्यानंतर त्यावर चहा पिणं आरोग्यासाठी अतिशय धोकादायक (Harmful For Health) असतं. यासंदर्भात हिंदुस्तानने माहिती दिली आहे. न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्सपर्ट वरुण कत्याल ( Varun Katyal, Nutritionist And Wellness Expert) यांच्यामते जेवल्यानंतर लगेच चहा घेण्याची पद्धत अतिशय वाईट (Bad Habit) आहे. त्यामुळे शरीरात पोषक घटकांचे (Healthy Nutrition’s) शोषण होत नाही. यामुळे पचनशक्तीवर परिणाम (Effect On Digestive system) होतो. शिवाय आयर्न आणि प्रोटीन शरीरामध्ये पचत नाहीत. (अजबच! चीनने अंतराळात पेरले तांदूळ, स्वर्गातला भात म्हणून सोशल मीडियावर PHOTO) हृदयाला धोका जेवणानंतर चहा प्यायची सवय असेल तर ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. चहामध्ये कॅफीन असल्यामुळे  ब्लडप्रेशर वाढू शकतं याशिवाय हायपर टेन्शन, हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी चहा मुळीच घेऊ नये. यामुळे हृदयावर परिणाम होतो. हृदयाचे ठोके वेगाने पडायला लागतात. अन्न पचण्यात अडचणी जेवल्यानंतर चहा प्यायची सवय असेल तर, आधीच बंद करा यामुळे खाल्लेलं अन्न पचत नाही आणि मग पोटामध्ये ऍसिड वाढायला लागतं. त्यामुळे अपचन ऍसिडिटी सारखे त्रास होऊ शकतात. (ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू; देशातलं पहिलं Grain ATM सुरू) शरीरात आयर्न कमी होतं जेवल्यानंतर चहा प्यायची सवय असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते आयर्न कमी झालं की, रक्तही कमी व्हायला लागतं. चहामध्ये फेनोलिक ऍसिड असतं यामुळे आयर्न शोषलं जात नाही. (Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी पराठा खावा की चपाती? हा आहे योग्य पर्याय) डोकदुखी डोकं दुखत असेल तर बरेच जण चहा पितात मात्र, जेवणानंतर चहा पिण्यामुळे शरीरामध्ये ऍसिड वाढून डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून जेवल्यानंतर एक ते दोन तासांनी चहा प्यावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Side effects

    पुढील बातम्या