Home /News /lifestyle /

पालकांनो लहानग्यांना जपा! कोरोनामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम; ऐका तज्ज्ञांचा सल्ला

पालकांनो लहानग्यांना जपा! कोरोनामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम; ऐका तज्ज्ञांचा सल्ला

पोस्ट कोव्हिड (Post Covid) परिणाम देखील पाहायला मिळालेत. त्यामुळे पालकांच्या मनात मुलांच्या शरीराबरोबर त्यांच्या मनावर आणि मेंदूवरही वाईट परिणाम होतो का? अशी शंका निर्माण झाली आहे.

    नवी दिल्ली, 11 जुलै : देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona)पसरली असताना तिसरा लाटेची (Third Wave)शक्यता वर्तवली जातेय. तज्ज्ञांच्यामते काळजी न घेतल्यास तिसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम होऊ शकतो. याआधी देखील आयआयटीच्या (IIT) वैज्ञानिकांनी तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळेच लहान मुलांच्या आरोग्याबद्दल प्रत्येक पालकाच्या मनामध्ये चिंता आहे. कोरोनाच्या आधीच्या 2 लाटांमुळे देखील मुलांना संसर्ग झाला होता. याशिवाय मुलांवर पोस्ट कोव्हिड (Post Covid) परिणाम देखील पाहायला मिळालेत. त्यामुळे पालकांच्या मनात मुलांच्या शरीराबरोबर त्यांच्या मनावर आणि मेंदूवरही वाईट परिणाम होतो का? अशी शंका निर्माण झाली आहे. या संदर्भात दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या(All India Institute of Medical Sciences, Delhi) पीडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिटचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर राकेश लोढा यांच्यामते कोरोना संसर्गाने मुलांमध्ये एसिम्पमॅटिक लक्षणं पाहायला मिळालेली आहेत. (कोरोनानंतर Bell's Palsy चा धोका; चेहऱ्यावर अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नका) फार कमी केसेमध्ये मुलांवरती गंभीर परिणाम पाहायला मिळाले आहेत. केवळ काही टक्के मुलांमध्ये गंभीर लक्षणं दिसून आली आहेत. (घातक आहेत ‘हे’ Foods Combinations; चुकूनही एकत्र खाऊ नका) डॉ.लोढा यांच्यामते गंभीर कोरोना लक्षणं असलेल्या लहान मुलांमध्ये फुफ्फुसांवर परिणाम पाहायला मिळाला. याशिवाय मेंदूवर देखील संसर्गाचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मुलांचं मानसिक संतुलन देखील बिघडू शकतं. फुफ्फुसांना इनफेक्शन झाल्यास मेंदूला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या नसांवरती परिणाम झाल्याने ऑक्सिजन पुरवठा चांगल्या प्रकारे होत नाही. यामुळे कोरोना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मुलांवरच्या आरोग्यावर परिणाम करतो. (झोपेत पायदुखीच्या दुखण्यानं झालात हैराण?, या 5 घरगुती उपायांचा होईल फायदा) बराच काळ लॉकडाऊन असल्यामुळे घरात राहिल्यामुळे देखील मुलांचं मानसिक आरोग्य बिघत आहे. याशिवाय कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे घरात पोषणयुक्त आहारावर होणार खर्च कमी झाला आहे. आर्थिक आणि सामाजिक नुकसानामुळे देखील मुलांचे मानसिक आरोग्य बिघडतं. त्यामुळे कोरोना संसर्ग झाला नाही तरी देखील मुलांचं मानसिक आरोग्य बिघडत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona patient, Coronavirus, Parents and child

    पुढील बातम्या