Home /News /lifestyle /

पनीरच आहे वेट लॉसचं Secret; पण खाण्याची पद्धत बदला

पनीरच आहे वेट लॉसचं Secret; पण खाण्याची पद्धत बदला

कच्चं पनीर खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो.

कच्चं पनीर खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो.

पनीर पचायला जड, वजन वाढेल म्हणून खात नसाल तर हे वाचाच. आरोग्याला किती फायदे (Health Benefits) आहेत हे माहिती आहे का, पण कसं खायचं पनीर तेही वाचा

    नवी दिल्ली,08 जुलै: पनीरपासून बनणारे अनेक पदार्थ आपण खातो. हॉटेलमध्ये गेल्यावर आवडीने पनीरच्या(Paneer)डिश ऑर्डर करतो. घरी पाहूणे येणार असले तरी, पनीरचे खास पदार्थ बनवतो. हे सगळे पदार्थ जितके टेस्टी (Testy Food)असतात तितकेच आरोग्यासाठी चांगले असतात. पण, कधी कच्च पनीर खाऊन पाहिलं आहे का? त्याची चव कदाचित आवडणार नाही. पण, शिजलेल्या पनीरपेक्षा न शिजलेलंच जास्त फायदेशीर(Benefits)आहे. कच्च्या पनीरमध्ये प्रोटीन,कार्बोदहायड्रेड,फॉलेट्स,व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियम सारखे अनेक पोषक घटक(Nutrients)असतात. त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे (Health Benefits) मिळतात. न शिजलेलं पनीर खाण्याचे आरोग्याला किती फायदे होतात जाणून घेऊयात.त्वचेला फायदाकच्चं पनीर खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो. यात प्रोटीनबरोबर व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन बी -1, व्हिटॅमिन बी -3, व्हिटॅमिन बी -6 यांच्यासह सेलेनियम,व्हिटॅमिन-ई आणि अँटी-ऑक्सिडंट्समधील अशी अनेक पोषक द्रव्य देखील आढळतात. जे फ्री रॅडिकल्सशी लढायला मदत करतात. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. वजन कमी करते कच्चं पनीर खाण्याने वजन कमी होण्यासही फायदा होतो. यात लिनोलिक ऍसिड असतं. जे शरीरातील चरबी वितळवण्याची प्रक्रिया वेगवान करतं आणि अतिरिक्त वजन नियंत्रित करण्यास मदत करतं. (स्तनपानातील अडचणी होतील दूर; ‘लॅक्टेशन मसाज’ आईसाठी आहे फायदेशीर) हाड मजबूत करतन शिजलेलं पनीर हाडं मजबूत बनवण्यात खुप मदत करतं. त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस असातात जे हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. अशक्तपणा दूर करतविकनेस आणि थकवा कमी होण्यासाठी कच्च्या पनीर खाणं फायदेशीर ठरतं. यातील पोषक घटक कमकुवतपणा आणि थकवा दूर करतात आणि रोग प्रतिकारशक्ती आणि प्लेटलेट वाढवण्यात देखील मदत करतात. (आजीच्या बटव्यातल्या पुडीचे इतके फायदे; सांधेदुखी, ब्लडशुगर, कोलेस्ट्रॉल करतं कमी) तणाव कमी करतरोजच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमुळे मनावर ताण येणं सामान्य गोष्ट बनली आहे. मात यावर करण्यासाठी कच्चं पनीर वापरता येऊ शकतं. यामुळे तणाव दूर होऊन आपल्याला उत्साही वाटायला लागतं. (मुलींपेक्षा मुलांना असतात Skin Problem; सोप्या उपायांनीही मिळतो फायदा) पच सुधारतं कच्च पनीर खाण्याने पचन प्रणाली सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. पनीरमध्ये आयसोटीन आणि सॉर्बिटोल घटक असतात. जे या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या