दिल्ली, 08 जुलै : त्वचेचे आजार (Skin Problem) हे महिलांबरोबर पुरुषांनाही होत असतात. आज-काल स्त्रियांबरोबर पुरुष देखील आपल्या त्वचेची तितकीच काळजी (Skin Care) घेऊ लागलेले आहेत. पुरुष आणि महिलांमधील त्वचेचे आजार हे वेगवेगळे असतात. मात्र पिंपल्स येणे किंवा ऑयली स्किन (Oily Skin) हा सर्वांनाच होणारा त्रास आहे. चेहऱ्यावर पिंपल्स आले की, टेन्शन देखील वाढायला लागतं. आपल्या पर्सनॅलिटीवरती याचा परिणाम होतो. पिंपल्सही पुरुषांसाठी देखीलही तितकीच जटिल समस्या आहे. पाहुयात पुरुषांमध्ये हे कोणत्या प्रकारचे स्किन प्रॉब्लेम्स (Skin Problem) होतात. ( Gymनंतर पाळावेत काही नियम; फायद्याऐवजी होईल नुकसान ) ऑयली स्किन महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांना ऑयली स्किनचा जास्त त्रास असतो. त्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर सीबम देखील खूप जास्त येतात. पुरुषांमधील हार्मोनल प्रॉब्लेममुळे स्किन ऑयली होत असते. त्यामुळे ऍक्ने किंवा पिंपल्स येतात. ऑयली स्किनचा त्रास असणाऱ्या पुरुषांनी वॉटर बेस्ट मोश्चसायझर वापरायला हवं. दिवासातून कमीतकमी दोन वेळा दोन वेळा चेहरा धुवायला हवा. याशिवाय आपल्या आहारामधून तेलकट पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत. ड्राय स्किन काही पुरुषांना ऑयली स्किनचा त्रास असतो तर काहींना अगदीच ड्राय स्किन झाल्यानेही काही त्रास होऊ शकतात. वातावरण, धूळ, कामाचं टेन्शन यांच्या परिणामामुळे मुलांची त्वचा ड्राय होत जाते. ड्राय स्किन मुळे जळजळ होणं, खेचल्यासारखं वाटणं, खाज येणं असेही त्रास व्हायला लागतात. ( OMG! दाढी आहे की ‘टॉयलेट सीट’ ? लॉकडाऊनमध्ये पुरूषांनी बदलली फॅशन ) कधीकधी ड्राय स्किनमुळे त्वचेवर तडेही जातात. ड्राय स्किनचा त्रास असणाऱ्या मुलांनी ऑईल बेस्ट मोश्चरायझर वापरावं. याशिवाय हर्बल फेस वॉश वापरल्यास फायदा मिळू शकतो. दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावं. वाढत्या वयात पिंपल्स प्रॉब्लेम काही मुलांनी टीनएज मध्ये पिंपल्स प्रॉब्लेम होतात. तर, काही पुरुषांना वाढत्या वयातही पिंपल्सची समस्या राहू शकते. पिंपल्स प्रॉब्लेम हा कधी कधी आपल्या शरीरातील बदलामुळे होत असतो तर, मानसिक तणाव, अतिरिक्त घाम यामुळे पिंपल्स येत असतात. पुरुषांना घाम येण्याचं प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त असतं. खुप जास्त पिंपल्स येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( कोरोनानंतर आता नवं संकट! Bone Death ची प्रकरणं वाढणार; मोदी सरकारने केलं सावध ) डार्क सर्कल महिलांप्रमाणेच पुरुषांनाही डार्क सर्कलचा प्रॉब्लेम होतो. टेन्शन, अपूरी झोप, जंक फूड यामुळे डार्क सर्कल व्हायला लागतात. याकरता नाईट अंडर आय क्रिम वापरता येऊ शकते. शक्य असल्यास चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फेस पॅक लावा. विटामिन ई कैप्सूलही वापरु शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.