बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा मुख्य आहार हे आईचं दूध असतं. आईचे दूध पचायला हलकं आणि तितकाच पोषक असतं. स्तनपान हे बाळाच्या निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी महत्त्वाचं असतं. पहिले 6 महिने बाळाला केवळ आईचं स्तनपान योग्य मानलं जातं.
2/ 9
स्तनपान बंद झाल्यानंतर महिलांना स्तनांमध्ये वेदना व्हायला सुरुवात होतात. स्तन लटकणं, कडक होणं,जड होणं, ताप येणं, निपलमधून दूध पाझरणे अशा समस्या यायला लागतात
3/ 9
ब्रेस्ट फीडिंगमध्ये अडचणी येत असतील तर, त्यावर लॅक्टेशन मसाज हा एक उपाय आहे. लॅक्टेशन मसाजमुळे स्तनांच्या पेशी रिलॅक्स होता आणि ब्रेस्टफीडिंग संबंधित समस्या दूर होतात.
4/ 9
लॅक्टेशन मसाज वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. पाठीवर झोपून कंबर थोडीशी वर उचला. शरीर पूर्णपणे सरळ ठेवा आणि रिलॅक्स पोझिशनमध्ये काही वेळ शांत पडून राहा.
5/ 9
तेल किंवा क्रीमने सर्क्युलर मोशनमध्ये ब्रेस्टला मसाज करा. बोटांच्या सहाय्याने हलक्या हाताने थोपटा किंवा हलक्या हाताने मसाज करा.
6/ 9
हात एकमेकांवर घासून स्तनांना उब द्या. यामुळे स्तनांमध्ये उष्णता निर्माण होईल. यासाठी गरम केलेल्या टॉवेलहा वापरू शकता. बाळाला दुध पाजण्याआधी आंघोळ करताना 30 ते 45 सेकंद स्तनांना मॉलिश करा.
7/ 9
मसाज केल्यावर स्तनांमधून थोडसं दूध निघत असेल तर, थोडा वेळ थांबा दूध हळूहळू जास्त निघायला लागल्यानंतर स्ट्रोक कमी करा. रिलॅक्स वाटेपर्यंत स्तरांमधून दूध काढत रहा.
8/ 9
स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये ब्रेस्ट इंगोर्जमेंट इंफेक्शनमुळे वेदना होत असतील तर,लॅक्टेशन मसाजमुळे कमी होतात. ब्रेस्टमध्ये दूध जास्त तयार होतं. दुधामध्ये लिपिड्स कॅसिन आणि एनर्जी वाढते आणि दुधाची क्वालिटी देखील सुधारते.
9/ 9
30 सेकंदापेक्षा जास्त काळ स्तनांना हलक्या हाताने मॉलीश करण्याने कोलाजन आणि ब्लड फ्लो वाढतो. स्तनांवरील स्ट्रेच मार्क्स देखील हळूहळू कमी होतात.