खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलेली लाईफस्टाईल यामुळे लिव्हरवर दबाव वाढतो, यामुळे विषारी पदार्थ आणि फॅटवर योग्यप्रकारे प्रक्रिया होत नाही. याकारणाने शरीरात लठ्ठपणा,हृदय रोग,थकवा,डोकेदुखी,पचनक्रिया बिघडणे, ऍलर्जी आणि इतरही समस्या होतात. अशावेळी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतं.
यकृताचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर, त्यासाठी चांगली लाईफस्टाईल आणि आहार घ्यावा. त्याकरता काही पदार्थ खाल्ल्यानेही फायदा होतो.
पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे.रूटेसी कुळातील या वनस्पतीचं शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो म्हणतात.
पपनसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी,पेक्टिन आणि ऍन्टीऑक्सिडंन्ट्स आढळतात जे लिव्हर क्लीनिंग प्रोसेसमध्ये मदत करतात. यात ग्लुटेथिओन नावाचं ऍन्टीऑक्सिडंन्ट्स असतं जे फ्री रेडिकल्स निकामी करतं आणि लिव्हरला डिटॉक्सीफाय करतं.
बीटमधील काही घटक यकृतासाठी सर्वोत्तम मानलं जातं. त्यामध्ये असलेलं बीटा कॅरोटीन यकृतला उत्तेजित करतं आणि त्याचं कार्य सुधारतं. यामुळे रक्ताची पातळी वाढते.
लिंबू लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. त्यातील डी-लिमोनेन नावाचं घटक यकृताच्या पेशी सक्रिय करतं. त्यामुळे यकृत स्वच्छ होण्यात मदत होते.
याशिवाय लिंबू खनिजांचं शोषण करण्यास उत्तेजन देतं. म्हणून,लिंबू-पाणी नियमितपणे घेतल्याने प्रचंड फायदा होऊ शकतो.
ग्रीन टी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानली जाते. शरीरात साचलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि यकृताला हानिकारक घटकांपासून वाचवते.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी लसूण खूप उपयुक्त मानला जातं. लसूण यकृतमधील एंजाईम्स सक्रिय करते. ज्यामुळे यकृत स्वच्छ करण्यास उपयुक्त ठरतं. यकृताचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं आणि त्याची ताकद वाढवते.
लिव्हर चांगलं ठेवण्यासाठी हळद सर्वोत्तम पदार्थांपैकी एक मानली जाते. हळद यकृत डिटोक्सिफाय करण्यास मदत करते आणि चरबी कमी करण्याची क्षमता सुधारते. यासाठी 1 ग्लास पाण्यात एक चतुर्थांश चमचा हळद एकत्र करुन उकळवून प्यावी. हे फायदेशीर ठरू शकतं.