advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / डिलीव्हरीसाठी तयार ठेवा Maternity Bag; हॉस्पिटलमध्ये जाताना अशी करावी तयारी

डिलीव्हरीसाठी तयार ठेवा Maternity Bag; हॉस्पिटलमध्ये जाताना अशी करावी तयारी

कधीकधी नेमकं हॉस्पिटलमध्ये काय सामान न्यावं याचीच माहिती महिलांना नसते. त्यामुळे ऐनवेळी धावाधाव होऊ शकते.

01
डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते. ही तयारी डिलिव्हरी डेट जवळ येण्याआधीच करायल हवी. हॉस्पिटलमध्ये कोणतं सामान न्यायचं आहे. याचा विचार करुन पॅकिंग करुन ठेवावं लागत.

02
हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मॅटर्निटी बॅगेत टॉवेल, हेअर ब्रश, टुथपेस्ट, टुथब्रश, फेसवॉश, बॉडीवॉश, शॅम्पू, कंडिश्नर,टिश्यू पेपर्स, छोटे नॅपकीन, रूमाल अशा गोष्टी आधीच ठेवा. प्रसूतीनंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यता असेल तर, या वस्तूंचा उपयोग होतो. बॅगेत स्लीपर ठेवायला विसरु नका.

03
बाळाला डायपर आणि वाईप लागू शकतात. त्यासाठी ऐनवेळेची धावपळ टाळण्यासाठी आधीच बॅग मध्ये ठेवा. नवजात बाळाला दिवसभरात कमीत कमी दहा ते बारा वेळा डायपर बदलावे लागतात.

04
यासाठी नवजात बाळासाठी असलेले डायपर तुमच्या बॅगेत ठेवा. बाळाची त्वचा ही संवेदनशील असते. म्हणूनच त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. बाळाला स्वच्छ करण्यासाठी निर्जंतूक असलेल्या बेबी वाईप्स वापर जरूर करा.

05
बाळ जन्मल्यानंतर घातले जाणारे कपडे आरामदायक आणि सुती असावेत. ज्यामुळे त्याला कोणताही त्रास होत नाही. यासाठी बाळाचे लंगोट, झबलं, टोपडं आणि दुपटी स्वच्छ धुवून निर्जंतूक करून सुकवा आणि बॅगेत भरून ठेवा. बाळाला घरी घेऊन येताना त्याला गुंडाळण्यासाठी बेबी ब्लॅंकेट बॅगेत ठेवणं फायद्याचं ठरू शकेल.

06
डिलीव्हरीनंतर काही दिवस ब्लिडींग होतं. ज्यासाठी आधीच तयारीत असणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्येही सॅनिटरी पॅड्स दिले जातात पण, ते आरामदायक असतीलचं असं नाही. त्यामुळे नेहमी वापरत असलेले सॅनिटरी पॅड्स जवळ ठेवावेत.

07
सी-सेक्शन डिलिव्हरी दरम्यान टाके येतात. अशा परिस्थितीत नेहमी घातले जाणारे अंडरवेयर उपयोगी पडतीलच असं नाही. त्यामुळे आरामदायक अंडरवेयर तयार ठेवा.

08
हॉस्पिटलमध्ये जाण्याआधी बॅगमध्ये ब्रा ठेवा जेणेकरून ऑपरेशननंतर घातला येतील. त्याबरोबर बॅगेत नर्सिंग ब्रा ठेवायला विसरु नका. बाळाला स्तनपान कराताना त्याचा उपयोग होतो.

09
ऑपरेशननंतर डॉक्टर सुद्धा सैल कपडे घालण्याचा सल्ला देतात म्हणूनच,पोटाच्या भागात सैल असलेले कपडे किंवा गाऊन आधीच बॅगेत ठेवावा. टाके पडलेल्या भागाला त्रास होणार नाही आणि कंफर्टेबल वाटेल असा गाऊन असावा.

10
टाके सुरक्षित राहण्यासाठी कॉम्प्रेशन बेल्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. कॉम्प्रेशन बेल्टने टाके पडल्यावरही सहजपणे हालचाल करता येते. सूजही कमी होते आणि पाठीच्या स्नायूंना देखील आधार मिळतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याआधी कॉम्प्रेशन बेल्ट बॅगेत ठेवावा.

  • FIRST PUBLISHED :
  • डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते. ही तयारी डिलिव्हरी डेट जवळ येण्याआधीच करायल हवी. हॉस्पिटलमध्ये कोणतं सामान न्यायचं आहे. याचा विचार करुन पॅकिंग करुन ठेवावं लागत.

    MORE
    GALLERIES