मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सावधान! बाळाच्या डोळ्यात काजळ घालत असाल आधी हे वाचा... थेट मेंदूवर होतो परिणाम

सावधान! बाळाच्या डोळ्यात काजळ घालत असाल आधी हे वाचा... थेट मेंदूवर होतो परिणाम

शरीरामध्ये लीड्चं प्रमाण वाढलं तर, बाळ कोमामध्ये जाऊ शकते.

शरीरामध्ये लीड्चं प्रमाण वाढलं तर, बाळ कोमामध्ये जाऊ शकते.

काजळ तयार करताना भरपूर प्रमाणामध्ये शिस्याचा (lead) वापर केला जातो. लीड आरोग्यासाठी हानिकारक आहे. शरीरामध्ये लीडचं प्रमाण वाढलं तर, बाळ कोमामध्ये जाऊ शकतं.

  • Published by:  News18 Desk
दिल्ली ,23 जून : लहान बाळांच्या डोळ्यामध्ये काजळ घातलं तर त्यांचे डोळे मोठे होतात आणि दृष्ट लागत नाही या समजापायी डोळ्यात काजळ घातला जातं. मात्र, आरोग्य तज्ज्ञांनाचा (Health Expert) याला विरोध आहे. आजही भारतात बऱ्याच कुटुंबांमध्ये लहान बाळांना दृष्ट लागू नये यासाठी काजळ लावलं जातं. पण, लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांमध्ये काजळ घालणं अयोग्य असल्याचं पिडियाट्रिशन आणि डॉक्टरांचं मत आहे. उलट डॉक्टरांच्यामते  (Is kajal safe for children) लहान मुलांच्या डोळ्यात काजळ गाण्याने त्यांच्या डोळ्यांच नुकसान होतं. एका संशोधनानुसार काजळ लहान मुलांसाठी एखाद्या विषाप्रमाणे (Kajal as Poison) काम करू शकतं. लहान वयात त्यांची नर्वस सिस्टिम विकसित होत असते. त्यामुळे काजळातील लीड किंवा शिसं विषारी ठरू शकतं. घालू नये डोळ्यात काजळ काजळ बनवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये लीडचा वापर केला जातो. शिसं आरोग्यासाठी हानिकारक आहे. किडनी, मेंदू आणि शरीराच्या इतर भागावर याचा वाईट परिणाम होतो. शरीरामध्ये लीडचं प्रमाण वाढलं तर, व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. इतकंच नाही तर, मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळेच लहान बाळांच्या शरीरामध्ये शिसं न गेलेलं चांगलं. नाहीतर त्यांच्यावरही वाईट परिणाम होण्याची भीती असते. (मासिक पाळीत पाणी न प्यायल्याने शरीरावर काय होतो परिणाम?) घरचं काजळही नको काही लोक घरी बनवलेलं काजळ लहान बाळांना घालतात. मात्र, घरी बनवलेलं काजळ देखील लहान मुलांसाठी सुरक्षित नसतं. यामधील कार्बन लहान मुलांच्या डोळ्यांना नुकसानदायक ठरतं. शिवाय काजळ लावताना बोटाचा वापर केला जातो. ज्यामुळे डोळ्यात इन्फेक्शन होऊ शकतं. काही गैरसमज लहान मुलांच्या डोळ्यामध्ये काजळ घातलं तर, त्यांचे डोळे आणि पापण्या मोठ्या होतात असा एक समज आहे. हा समज अतिशय चुकीचा आहे. (ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं योगासनांचं महत्त्व; दररोज करा ही 5 आसनं) काजळ लावल्याने लहान मुलं जास्त वेळ झोपतात असं म्हणतात. मात्र, संशोधनानुसार लहान मुलं दिवसभरात 18 ते 19 तास झोपतातच, हे सिद्ध झालं आहे. काजळ लावल्यामुळे मुलांना वाईट नजर लागत नाही किंवा दृष्ट पडत नाही मात्र, याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कोणताही आधार नाही.
First published:

Tags: Health, Health Tips, Small baby

पुढील बातम्या