• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • अरे बापरे! तुम्हीही पाणी उभ्याने पिता का? आधी हे काळजीपूर्वक वाचा

अरे बापरे! तुम्हीही पाणी उभ्याने पिता का? आधी हे काळजीपूर्वक वाचा


उभं राहून पाणी पिण्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो.

उभं राहून पाणी पिण्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो.

उभं राहून पाणी पिण्याची सवय शरीरावर कितीतरी वाईट परिणाम (Side Effect) करते. तुम्ही अनेक आजारांना या सवयीने आमंत्रण देत असता.

  • Share this:
    दिल्ली,06 जुलै: खुपवेळा घाईघाईत किंवा वेळ नाही म्हणून उभं राहून आपण पाणी पितो (Drinking Water). पण जितकं जेवण शांतपणे खाली बसून करणं आवश्यक असतं, तितकचं पाणीही खाली बसून प्याला हवं याची माहिती आहे का? पाणी शरीराला अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एका दिवसात 8 ते 10 ग्लास प्यावं याची माहिती सगळ्यांनाच असते. पण, पाणी पिण्याची योग्य पद्धतही (Right Method of Drinking) असाला हवी तरच पाणी पिण्याचा फायदा होतो. नाहीतर, काही साईड इफेक्टही (Side Effect)होतात. उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. (महिलांनो कौटुंबिक हिंसेपासून सुरक्षेसाठी जाणून घ्या कायदेशीर अधिकार) पण बसून पाणी प्यायल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक (Parasympathetic)म्हणजेच स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणाऱ्या प्रक्रिया रिलॅक्स आणि डायजेशन मोडवर असते. त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो. जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो,तेव्हा अन्ननलिकवर दाब घेऊन पाणी पोटात वेगाने पोहोचतं. यामुळे आपल्या पोटावर जास्त दबाव येतो. (अडचणीत स्व-सुरक्षेसाठी गरजेचा पेपर स्प्रे; विकत आणण्यापेक्षा असा बनवा घरीच) दबावामुळे,पोट आणि पाचन संस्थेला इजा होते. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. पाण्याने प्रेशरने पोटात प्रवेश जातं तेव्हा, सर्व घाण मूत्राशयात जमा होते, ज्यामुळे किडनीचं गंभीर नुकसान होतं. पाण्याच्या प्रेशरचा बायोलॉजिकल सिस्टीवर परिणाम होतो.उभं राहून पाणी पिण्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. (जुलै महिन्यात जन्मलेल्यांचा स्वभाव ओळखणं कठीण; मात्र वेळ पडली तर...) शरीरात अन्ननलिका आणि श्वासनलिकेत ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. नेहमी लोक उभं राहून पाणी पिणाऱ्याना फुफ्फुसांसह हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. उभ्याने पाणी पिण्याने तहान जात नाही. समाधान न झाल्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागेल. उभ्याने आणि घाईघाईने पाणी पिण्याच्या सवयीमुळे सांधेदुखीचा म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published: