जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अडचणीत स्व-सुरक्षेसाठी गरजेचा पेपर स्प्रे; विकत आणण्यापेक्षा असा बनवा घरीच

अडचणीत स्व-सुरक्षेसाठी गरजेचा पेपर स्प्रे; विकत आणण्यापेक्षा असा बनवा घरीच

अडचणीत स्व-सुरक्षेसाठी गरजेचा पेपर स्प्रे; विकत आणण्यापेक्षा असा बनवा घरीच

प्रवास करताना आपल्या सोबत काही वाईट प्रसंग ओढावला तर, सुरक्षेची साधनं (Safety Equipment) आपल्या जवळ असायला हवीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 जुलै:  आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे (Incidents of Atrocities) बऱ्याचदा घराबाहेर पडताना भीती वाटते. महिला असो किंवा मुली सगळ्यांच्याच मनात काळजी असते. आज-काल लहानांपासून वयोवृद्धांवर देखील बिकट प्रसंग ओढावलेले आपल्याला माहिती असले. पण या परिस्थितीत देखील आपण आपल्या सुरक्षेसाठी (Safety) एखादं हत्यार बाळगू शकत नाही. त्यामुळे एखादी अशी वस्तू आपल्या जवळ ठेवा जी आपल्यावर अतिप्रसंग आला तर उपयोगी ठरू शकते. याकरता आपण पेपर स्प्रे (Paper Spray) वापरू शकतो. बाजारात अनेक प्रकारचे पेपर स्प्रे मिळतात किंवा आपण घरीसुद्धा पेपर स्प्रे**(Home Made** Paper Spray**)** बनवू शकता. पेपर स्प्रे बनवण्याची सोपी पद्धत एखादी छोटी बॉटल, दोन चमचे काळी मिरी पावडर, दोन चमचे लाल मिरची पावडर, पाणी एवढच साहित्य आपल्याला पेपर स्प्रे बनवण्यासाठी लागणार आहे. ( दररोज आंघोळ केल्याचे मोठे दुष्परिणाम; आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक ) सगळ्यात आधी एका भांड्यात थोडं पाणी घ्या. त्यानंतर यामध्ये काळीमिरी पावडर आणि लाल मिरची पावडर टाका आणि घट्ट पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये हळूहळू पाणी ओता आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा. मिश्रण एका भांड्यामध्ये घेऊन उकळी येईपर्यंत गरम होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झालं की, स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे बॉटमधून हे मिश्रण बाहेर पडतं का हे आधी चेक करा. अशाप्रकारे बनवलेली स्प्रे बॉटल  सहजपणे आपल्या बॅगेत कॅरी करू शकता. ( तुमच्या शरीरात रक्त कमी आहे, कसं ओळखाल; लक्षणं दिसताच सुरू करा ‘हे’ उपाय ) लक्षात ठेवा हा स्प्रे बनवताना आपल्या हातामध्ये ग्लोव्ज घालायवा विसरू नका. नाहीतर हातांची आग होऊ शकते. डोळ्यावर देखील एखादा चष्मा किंवा गॉगल लावा. ज्यामुळे पावडर डोळ्यात जाणार नाही. नाकावर एखादा मास्क लावा. स्प्रे बॉटल लहान मुलांपासून दूर ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात