• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • चुकूनही ठेवू नका फ्रीजमध्ये आंबा; ही आहे टिकवण्याची योग्य पद्धत

चुकूनही ठेवू नका फ्रीजमध्ये आंबा; ही आहे टिकवण्याची योग्य पद्धत

रूम टेम्प्रेचरवर आंबा चांगला पिकतो .

रूम टेम्प्रेचरवर आंबा चांगला पिकतो .

उन्हाळ्यात मिळणारे आंबे (Mango) जास्त दिवस टिकावेत यासाठी फ्रिजमध्ये (Refrigerator)ठेवत असाल तर, आधी ही महत्त्वाची माहिती वाचा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 जून:उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात आंबे (Mango) येतात. आंबा प्रेमींसाठी ही पर्वणी असते. सगळेचजण आवडीने आंबे खातात. त्यामुळे या दिवसात आंबे घरी येतातच. काही लोक आंबे फ्रिजमध्ये (Refrigerator) ठेवता किंवा बाहेर. आंबे जास्त दिवस टिकावेत यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. पण,आंबा फ्रिजमध्ये ठेवल्याने चांगला राहतो का? फ्रिजमध्ये ठेवलेला आंबा खाणं योग्य आहे का ? अशा अनेक शंका मनात येणं साहजिक आहे. मैंगो ऑर्गनुसार आंबे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची पोषण मूल्य आणि चव (Health Benefits & Test) यांच्यावर परिणाम होतो. तर, एसबीएसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार,आंबा फ्रीजमध्ये ठेवणंच चांगलं नाही. त्यामुळे आंबा फ्रिजमध्ये ठेवावा की नाही याची माहिती जाणून घ्या. त्यामुळे आंबा चांगल्या प्रकारे साठवताही येईल. (मुलांच्या निकोप वाढीसाठी करू नका ‘या’ चुका, पालकांनी बदला चुकीच्या सवयी) आंबा फ्रीजमध्ये ठेवू नकायूनायटेड स्टेट्स डिपार्टमेनट ऑफ ऍग्रीकल्चरच्या (United States Department of Agriculture) अहवालानुसार आंबे आणि इतर सर्व फळं रूम टेम्प्रेचवर ठेवणंच चांगलं. फळं रूम टेम्प्रेचरवर ठेवल्याने त्यातील ऍन्टीऑक्सिडेंट चांगेल राहता. यामुळे आरोग्याला फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते, आंबा आणि ट्रॉपिकल फळं फ्रिजमध्ये ठेवू नयेत. अशी फळं लवकर खराब होतात. (ही लक्षणं सांगतात तुम्ही Pregnant आहात; Period मिस होण्याआधीच शरीरात होतात बदल) हे लक्षात ठेवा कच्चा आंबा म्हणजे कैरी फ्रीजमध्ये कधीही ठेवू नका. त्यामुळे कैरी पिकत नाही आणि चवही बिघडते. रूम टेम्प्रेचरवर आंबा चांगला पिकतो आणि त्याची गोडी चांगली राहते. आंबे लवकर पिकवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून रूम टेम्प्रेचवरच ठेवावेत. पण, पिकलेला आंबा टिकवायचा असेल फ्रीजमध्ये ठेवू शकता. (डबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी) पूर्णपणे पिकलेले आंबे रेफ्रिजरेटरमध्ये 5 दिवसांपर्यंत ठेवता येतात. फ्रिजमध्ये ठेवताना घ्या काळजी  पिकलेले आंबे, सोलून, तूकडे करून एअरटाईट कंटनरमध्ये फ्रिजमध्ये ठेवल्यास 6 महिने टिकतात.  फ्रिजमध्ये जागा नसेल तर, इतर भाज्या आणि फळांबरोबर आंबे ठेवू नका. त्यामुळे त्यांची चव बिघडते.
  Published by:News18 Desk
  First published: