पतीपत्नी बाळाबद्दल विचार करतात तेव्हा, त्यांच्या मनात आरोग्याच्या समस्यांबद्दल (Health Problems) पुसटशी कल्पनाही येत नाही. त्यामुळे अनेकदा प्रयत्न करूनही मुल होत नसेल तेव्हा,मनात निराशा वाढायला लागते.
त्यामुळे पुरुष किंवा महिला यांनी गर्भधारणा आणि त्यातील समस्या यांची माहिती घ्यायला हवी.इनफर्टिलिटीची नेमकी माहिती तरुण जोडप्यांना नसल्यामुळे काही लक्षणं दिसून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होतं.
वर्षभर प्रयत्न करुनही गर्भधारणा होत नसेल तर, इनफर्टिलिटीचं (Infertility) हे लक्षण समजावं. वयानुसार स्त्री आणि पुरुषांमध्ये फर्टिलिटी (Infertility) पॉवर कमी होते.
आई बनण्याचा प्रयत्न योग्य वयात न केल्यास त्याचे परिणाम सहन करावे लागतात. महिलांना पस्तीशीनंतर गर्भधारणेत अडचणी येतात. तर, पुरुषांमध्ये 30 नंतर स्पर्म क्वॉलिटी (Sperm quality) घसरायला लगते.
ओव्हरवेट महिलांमध्ये हार्मोन्स बॅलन्स (Hormones balance) बिघडतो. वाढलेल्या वजनामुळे गर्भधारमेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बाळाचं प्लॅनिंग करतांना वजनाकडे लक्ष द्या.
मासिक पाळी वेळेवर नसेल तर, गायनॅकलॉजिस्ट (Gynecologist)चा सल्ला घ्यावा. कारण गर्भधारणेसाठी मासिक पाळी नियमित असणं आवश्यक आहे.
चुकीची औषधं घेतल्याने गर्भधारणेत मोठी अडचण येऊ शकते. काही मानसिक आजारांमध्ये दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे फर्टिलिटीमध्ये अडचणी येतात. डिप्रेनच्या त्रासात काही औषध घ्यावी लागतात त्याने गर्भधारणेत परिणाम होतो.
दारूचं व्यसन आणि धुम्रपान याचा फर्टिलिटीवर परिणाम होतो. त्यामुळे बाळाचा विचार कतरत असाल तर, आपल्याला असलेली व्यसनं सोडायला हवीत. महिला आणि पुरुषांनी बाळाचा विचार करताना व्यसनं बंद करायला हवीत.