मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पौष्टिक म्हणून अंडं आणि दूध एकत्र घेताय? तुम्हीच करताय स्वत:चं नुकसान

पौष्टिक म्हणून अंडं आणि दूध एकत्र घेताय? तुम्हीच करताय स्वत:चं नुकसान

काही लोक कच्च अंड देखील दुधाबरोबर पितात.

काही लोक कच्च अंड देखील दुधाबरोबर पितात.

Health Advice: कच्चं अंडं आणि दूध अजिबात खाऊ नका हे दोन पदार्थ एकत्र. होऊ शकतात गंभीर परिणाम. दूध-अंडं दोन्ही नाश्त्याला खायचं असेल तर आधी हे वाचा. कसं खावं?

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 जुलै :  : अंडी प्रोटीनचा एक मोठा स्रोत आहे (Egg is Source of Protein).त्यामुळे आरोग्यासाठी फायेदशीर (Beneficial for health) असलेल्या पदार्थांमध्ये अंड्याला महत्व आहे. अंड्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल,फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी5, व्हिटॅमीन बी6, व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन के हे पोषक (Healthy) घटक असतात. त्यामुळेच जगभरातले कित्येक लोक अंडी आवडीने खातात. अंडी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो असं मानणारा एक वर्ग आहे तर, अंडी खाल्ल्यामुळे नुकसान(Damage)होतं असंही काही लोकांचं म्हणणं आहे.

अंड्यांमधून शरीराला अधिक ऊर्जा (More Energy)मिळते. अनेकजण आवडीने उकडलेलं अंडं (Boiled Egg) खातात. काहीजण अंड्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतात. घाईच्यावेळी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायला सोपा पदार्थ म्हणजे ऑम्लेट आणि अंड्याचे इतर पदार्थ त्यामुळेच मांसाहारी (Non-Vegetarians) लोकांच्या घरामध्ये अंडी असतातच.

(पावसाळ्यात होणार नाही खोकल्याचा त्रास; करा सोपे घरगुती उपाय)

बरेचजण अंड्यासोबत दूध घेतात. काही लोक कच्च अंड देखील दुधाबरोबर पितात. मात्र. अंड दुधाबरोबर घेणं योग्य आहे की अयोग्य असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.

(कमी लोण्यात निघेल जास्त रवाळ तूप; ‘या’ सोप्या टिप्स वापरा)

अंडी आणि दुधाची तुलना केली तर अंड्यामध्ये जास्त प्रोटीन असतं. एका अंड्यामध्ये दुधाच्या तुलनेत 305% जास्त प्रोटीन असतं तर, दुधाच्या तुलनेत 175 % फॅट असतं. 100 मिलीग्राम दुधापासून 61 केसीएल एनर्जी मिळते अंड्या पासून 143 केसीएल ऊर्जा मिळते.

(अजबच! चीनने अंतराळात पेरले तांदूळ, स्वर्गातला भात म्हणून सोशल मीडियावर PHOTO)

दूध आणि अंड एकत्र घ्यावं का?

अंड आणि दूध दोन्ही देखील प्रोटीन मोठा स्त्रोत आहेत. मात्र न शिजलेल्या अंड्याबरोबर दूध पिऊ नये. यामुळे आरोग्यास हानी पोहचू शकते. अंडी आणि दूध एकत्र घेतल्यामुळे फुड पॉयजनिंग आणि पोट खराब होणे असे त्रास होऊ शकतात. अंड आणि दूध यामध्ये 1 ते 2 तासांचं अंतर असणं आवश्यक आहे. उकडलेल्या अंड्याबरोबर दूध घेतलं तर चालू शकतं. मात्र कच्च्या अंड्याबरोबर दूध कधीच पिऊ नये.

First published:

Tags: Dangerous milk combinations, Food, Health Tips, Milk combinations