मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फक्त करा 4 बदल; डोकेदुखीचा त्रास कायमचा संपेल

फक्त करा 4 बदल; डोकेदुखीचा त्रास कायमचा संपेल

जगभरात हायपरटेन्शनचा त्रास असलेल्या लोकांची संख्या गेल्या 30 वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. आपल्या शरीराला विविध अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी रक्तदाब असणं आवश्यक असतं. रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात.
तीव्र डोकेदुखी, प्रचंड थकवा, एन्झायटी, डोळ्यांच्या समस्या आणि छातीत दुखणे ही काही सामान्य लक्षणं दिसतात.

जगभरात हायपरटेन्शनचा त्रास असलेल्या लोकांची संख्या गेल्या 30 वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. आपल्या शरीराला विविध अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी रक्तदाब असणं आवश्यक असतं. रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. तीव्र डोकेदुखी, प्रचंड थकवा, एन्झायटी, डोळ्यांच्या समस्या आणि छातीत दुखणे ही काही सामान्य लक्षणं दिसतात.

आपल्याच काही वाईट सवयी डोकेदुखीला आमंत्रण देत असतात. त्यामुळे लाईफस्टाईलमधला थोडाबदल हा त्रास कायमचा संपवू शकतो.

नवी दिल्ली, 17 जुलै :  धावपळीच्या आयुष्यामध्ये डोकेदुखी (headache) एक सामान्य समस्या बनलेली आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी डोकेदुखीचा त्रास झालेला असतो. अपूरी झोप,वेळी-अवेळी खाणं, दिवसभराची धावपळ यामुळे डोकेदुखी होते. डोकेदुखी झाल्यानंतर काहीच सुचत नाही की काम करण्याची इच्छा राहत नाही.

डोकेदुखीमुळे वेदनांमुळे (Paining) त्रस्त झाला असाल तर, लाईफस्टाईलमध्ये (Lifestyle) काही बदल करून बघा. रुटीन मधल्या काही छोट्या बदलामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

हेल्दी फूड

दिवसभर आपण काय खातो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. काही लोकांना चहा,कॉफी, मद्यपान करण्याची सवय असते. याशिवाय तिखट,तळलेले पदार्थ, प्रोसेस फूड खाण्याची सवय असेल तर हे देखील डोकेदुखीचं कारण ठरू शकतं. त्यामुळे अशा सवयी असतील तर त्या बदलून टाका. काही लोक डायटिंगच्या नावाखाली दिवसभर उपाशी राहतात किंवा कमी खातात. भूक लागल्यामुळे देखील ऍसिडिटी वाढून डोकेदुखी होऊ शकते. यामुळे नियमित चांगला आहार घ्यावा.

(या गावरान भाजीने दुर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग)

टेन्शन

टेन्शन वाढल्यानंतर मायग्रेन सारखा त्रास व्हायला लागतो. मायग्रेनमध्ये तीव्र डोकेदुखी होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका. यासाठी मेडिटेशन, योगा, व्यायाम याशिवाय वॉक करण्याने देखील फायदा होऊ शकतो. व्यायाम केल्यानंतर मन उत्साही राहतं. त्यामुळे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात.

(OMG!कोरोना बरा झाल्यावरही संकट टळत नाही; ‘ही’ समस्याही ठरतेय डोकेदुखी)

स्मोकिंग टाळा

धूम्रपानाची सवय असेल तर, आपल्या फुफ्फुसांवर त्याच्या वाईट परिणाम होतो. याशिवाय आपली इम्युनिटी देखील कमी होते. स्मोकिंगमुळे शरीराला फायद्या ऐवजी नुकसानच होत असतं. सिगरेटमध्ये निकोटीन असतं त्यामुळे रिकाम्या पोटी सिगारेट ओढल्यामुळे डोक्यामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात.

(जेवल्यानंतर चहा पिण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम; आजच सवय बंद करा)

झोपेचं वेळापत्रक बनवा

अपूऱ्या झोपेमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. योग्य वेळी जेवणाबरोबरच योग्य वेळी आणि पूर्ण झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्ण झोप घेतली तर, दुसर्‍या दिवशी आपल्याला उत्साही वाटतं. यामुळे झोपेचे वेळापत्रक बनवा आणि त्या वेळेस पूर्ण झोप घ्या.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle