मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health tips : कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर घरच्या घरी करा प्रभावी आयुर्वेदिक उपाय

Health tips : कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर घरच्या घरी करा प्रभावी आयुर्वेदिक उपाय

रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामध्ये भरपूर लिंबूवर्गीय अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.

रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामध्ये भरपूर लिंबूवर्गीय अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.

आयुर्वेदिक उपचारांनीही कमी रक्तदाबातून उद्भवणारी गुंतागुंत टाळता येते. जाणून घ्या कशी.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 मार्च : उच्च रक्तदाबासारखाच कमी रक्तदाबही आरोग्याला अनेक प्रकारे हानिकारक असतो. याला हायपोटेन्शन असंही म्हणतात. आपला रक्तदाब 120/80 असला पाहिजे. मात्र रक्तदाब याहून खाली जातो तेव्हा तो कमी रक्तदाब मानला जातो. (health tips)

मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, रक्तदाब कमी झाल्यावरही शरीरातील गरजेचे अवयव, जसे की, मेंदू, फुफ्फुसं, किडनी हे योग्य कार्य करत नाहीत. कारण त्यांना नीटपणे रक्त पोचत नाही. यातून ब्रेन स्ट्रोक, किडनी फेल्युअर, हार्ट अटॅक यांचाही धोका संभवतो. (health news)

साधारणतः कमी रक्तदाबात औषधांची गरज नसते. जीवनशैलीत बदल करून तुम्ही याचा उपचार करू शकता. समजून घ्या काही आयुर्वेदिक उपचार ज्यांच्या मदतीनं तुम्ही रक्तदाब एकदम सामान्य करू शकता. (home remedies for low blood pressure)

आलं

आल्याचे लहान-लहान तुकडे करा. यात लिंबाचा रस आणि सैंधव मीठ मिसळा. या गोष्टी एका बरणीत ठेवा. याला थोडं-थोडं दिवसातून 3-4 वेळा खा. काही दिवसातच रक्तदाब सामान्य होईल. how to prevent low blood pressure,

टोमॅटो

टमाट्याच्या रसात काळं मीठ, काळे मिरे टाकून प्या. काही दिवस सतत हे केल्यास प्रभाव दिसेल. (ayurved in low blood pressure)

बीटचा रस

कमी रक्तदाबात बीटचा रस प्रभावी असतो. रोज सकाळ संध्याकाळ याचा ज्यूस प्या. खूप फरक पडेल. (ayurved to cure low blood pressure)

खजूर

खजूर दुधात उकळा आणि रोज प्या. वाटल्यास नाश्त्यात खजूर खाऊ शकता. हे खूप फायदेशीर ठरेल.

दालचिनी

दालचिनीचे काही तुकडे पाण्यात उकळा आणि सकाळ संध्याकाळ प्या. हे कमी रक्तदाबात कामाला येतं.

ताक

ताकामध्ये मीठ, भाजलेले जिरे, हिंग मिसळून रोज खा. यातून रक्तदाब सामान्य होईल.

आवळा

आवळ्याच्या ताज्या रसामध्ये मध टाकून खाल्ल्यास हे कमी रक्तदाबात फायद्याचं ठरतं. आवळा तुम्ही मुरांबा किंवा कँडीच्या रूपातही खाऊ शकता.

हेही वाचा कोरोना लशीचा बूस्टर शॉट काय असतो आणि तो का घ्यायलाच हवा?

मनुका

कमी रक्तदाब असेल तर मनुका खाणं फायदेशीर आहे. रात्री थोड्या मनुका भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी खा.

गाजर

कमी रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास गाजर खूप उपयोगी आहे. गाजराच्या रसात एक चतुर्थांश पालकचा रस टाकून पिल्यास खूप फायदा होतो.

हेही वाचा गायत्री मंत्राच्या जपामुळे Covid-19 बरा होईल का? शास्त्रज्ञांनी सुरू केला अभ्यास

काय लक्षणं आहेत?

अर्थ च्या वृत्तानुसार, थकवा, नैराश्य, मन चलबिचल होणं, तहान लागणं, त्वचा पिवळी पडणं, शरीर थंड होणं, अर्धवट आणि वेगवान श्वास, छातीत दुखणं, अनियमित धडधड, मान आखडणं ही सामान्य लक्षणं आहेत. दीर्घकाळ कमी रक्तदाबाची समस्या राहिली तर उलट्या, शुद्ध हरपणे, खूप थकवा, धूसर दिसणं अशा समस्या उद्भवतात.

First published:

Tags: Ayurved, Health Tips, Home remedies