नवी दिल्ली,27 जुलै: आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर
(Effect On Mental and Physical health) होत असतो. कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला खुप राग येतो आणि कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय बेचैन वाटायला लागतं. आयुर्वेदानुसार
(According Ayurveda) आपली खाण्याची सवय हे यामागील प्रमुख कारण आहे. सात्विक आहार घेतल्यास सकारात्मक उर्जा मिळते. तर, तामसिक जेवणाने आपल्यामध्ये क्रोध,हिंसा यासारख्या भावनांना उत्तेजना मिळते असं आयुर्वेदात सांगतं. म्हणजेच आयुर्वेदानुसार शाकाहारी आहार
(Vegetarian Food) आपल्या भावनांवर
(Feelings) नियंत्रीत ठेवण्या महत्वाचा आहे. शाकाहार घेतल्यास कशा प्रकारे आपल्या भावनांवर परिणाम होतो हे ते जाणून घेऊ यात.
(
करा तुमच्या Fitness Journey ला सुरुवात, या सवयी सोडलात तर राहाल तंदुरुस्त)
सेल्फ कंट्रोल वाढतो
शाकाहारी जेवण घेणाऱ्यांमध्ये स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची ताकद असते. त्यामुळे आपल्यामध्ये आत्मसंयम वाढवतो. आयुर्वेदानुसार आपल्या सर्वांमध्ये एक प्रकारची ऊर्जा काम करत असते. जेव्हा आपण शाकाहार घेतो तेव्हा आपण सकारात्मक विचार करतो आणि आपण मांसाहारी घेतल्यास नकारात्मक.
(
घरात झाला पालींचा सुळसुळाट; ‘या’ उपायांनी संपवा कायमचा त्रास)
अॅक्टिव्ह राहण्यात मदत करतं
शाकाहारी पदार्थांमुळे शरीरात चरबी कमी प्रमाणात असते तर, मांसाहारी जेवणात तेल आणि चरबी जास्त असते. यामुळे शरीरात चरबी जमायला लागते आणि वजनही वाढतं. ज्यामुळे स्थूलपणा येतो आणि आपलं शरीर जास्त अॅक्टिव्ह राहत नाही.
(
घरात लावा ही रोपं! आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा)
शांतता आणि एकाग्रता
शाकाहारी आहार हा सात्विक मानला जातो. त्यामुळे शांतता,एकाग्रता आणि मनामध्ये प्रेमाची भावना वाढवते. शकाहाराने मनात आशावादी विचार निर्माण होतात आणि उदासीनता कमी होते. आयुर्वेदानुसार ज्या लोकांना जास्त राग येतो त्यांनी शाकाहार केला पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.