मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चेहराही देतो शरीरात कोलोस्ट्रॉल वाढल्याचा Alert; या 3 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

चेहराही देतो शरीरात कोलोस्ट्रॉल वाढल्याचा Alert; या 3 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

याशिवाय हायपर टेन्शन, हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी चहा मुळीच पिऊ नये. यामुळे हृदयावर परिणाम होतो हृदयाचे ठोके वेगाने पडायला लागतात.

याशिवाय हायपर टेन्शन, हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी चहा मुळीच पिऊ नये. यामुळे हृदयावर परिणाम होतो हृदयाचे ठोके वेगाने पडायला लागतात.

कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये मेद जमा (Plugged Into Blood Vessels) होतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका वाढतो.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली,03 जुलै: सध्याच्या काळात शरीरात कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढणं ही गंभीर समस्या बनलेली आहे. त्यामुळे हार्ट अटॅक (Hart Attack), स्ट्रोक (Stroke)  सारखे त्रास होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल मेणासारखा गुळगुळीत पदार्थ असतो. लिपिड्सचा (Lipids) भाग असलेला हा पदार्थ शरीरात पेशींमध्ये (Cells) आढळतो. रक्त कोलेस्ट्रॉल शरीराच्या सगळ्या भागात पोहोचवण्याचं काम करतं.

कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (Low Density Lipoprotein)म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (High Density Lipoprotein) म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाग जमा (Plugged Into Blood Vessels) होतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अलिकडच्या काळात उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या रूग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आहारात जास्त ट्रान्स फॅट (Trance Fat) आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ घेतल्यास हा त्रास

(वजन कमी करण्यासाठी अतिरिक्त प्रोटीन घेणं थांबवा! नाहीतर गंभीर परिणाम भोगा)

होतो. याशिवाय लठ्ठपणा,धूम्रपान आणि विशिष्ट औषधं घेण्याने शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.

एका अहवालानुसार, हाय कोलेस्टेरॉलच्या रुग्णांची संख्या शहरांमध्ये 20-25 टक्क्यांनी वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्याही 15 ते 21 टक्क्यांनी वाढली आहे.  कोलेस्ट्रॉलवर वेळेत नियंत्रण येण आवश्यक असतं. कोलेस्ट्रॉल वाढला तर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. या व्यतिरिक्त, रुग्णांना हाय कोलेस्ट्रॉल असल्यास स्ट्रोक (Stroke) होण्याची शक्यता असते. त्याच वेळी, वेळेवर लक्ष न दिल्यामुळे शुगर लेव्हल वाढू शकते.त्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यावर काय लक्षणं दिसतात हे समजून घ्यायला हवं.

(लिक्विड डाएटमुळे वेळेआधीच येईल म्हातारपण; हे 4 ड्रिंक्स कधीच पिऊ नका)

त्वचा

कोलेस्ट्रॉल वाढला तर त्वचेवर लगेच लक्षणं दिसतात. डोळे, तळवे आणि पायांच्या खालच्या भागाखाली तांबडा किंवा पिवळा रंग दिसत असेल तर, कोलेस्टेरॉलची पातळी तपासायला हवी. आपल्या त्वचेच्या रंगात बदल दिसायला लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

डोळे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तर, डोळ्यांमध्ये त्याची लक्षणं दिसतात. याला आर्कस सेनिलिस म्हटलं जातं. हाय कोलेस्टेरॉलच्या रूग्णांच्या डोळ्याच्या कॉर्नियाच्या बाहेरील भागात निळे किंवा पांढरे उंचवटे आल्यासारखे दिसायला लागतात. अशा वेळेस लगेच कोलेस्टेरॉलची पातळी तपासली पाहिजे.

(जे वाटलं सुंदर ते निघालं डेंजर! फुलाचा सुगंध घेताच गायिकेची झाली भयंकर अवस्था)

हात

शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे बर्‍याच वेळा हातात वेदना होऊ शकतात. कोलेस्ट्रॉलमुळे, रक्तवाहिन्यांच्या आतल्या भागात अतिरिक्त चरबी जमा होते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. यामुळे लोकांच्या हातात वेदना होऊ लागतात.

First published:

Tags: Health Tips, Heart Attack, Heart risk