उटावा, 01 जुलै : समोर सुंदर फूल (Flower) दिसलं की त्याचा सुगंध घेण्याचा मोह तसा कुणालाच आवरणार नाही. प्रत्येक सुंदर दिसणारं फूल हे चांगलंच असतं असं नाही. काही फूल तुमच्यासाठी घातकही (Danger flower) ठरू शकता. अशाच फुलांपैकी एक असलेल्या फुलांचा सुगंध घेणं दोन महिलांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण हे सुंदर फूल जितकं सुंदर होतं, तितकंच ते डेंजर (Drug flower) होतं. कॅनडाच्या टोरंटोमधील ही घटना आहे. टिकटॉकर, गीतकार आणि गायक असलेली राफेला वेमन (Raffaela Weyman) आणि तिच्या मैत्रिणीला मोठं आणि पिवळ्या रंगाचं सुंदर फूल दिसलं. त्यांनी हे फूल तोडून घरी नेलं आणि दोघींनीही या फुलाचा सुगंध घेतला. त्यानंतर त्यांना असं वाटू लागलं, जसं काही त्यांनी नशाच केली आहे.
या दोघींनी फुलाचा सुगंध घेत आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या फुलाचा सुगंध घेतल्यानंतर आपली झालेली भयंकर अवस्था आणि फुलाबाबतचा आपला अनुभव स्वतःच सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे वाचा - लिक्विड डाएटमुळे वेळेआधीच येईल म्हातारपण; हे 4 ड्रिंक्स कधीच पिऊ नका वेमननं सांगितलं, आम्हाला हे सुंदर फूल सापडलं आणि आणि पूर्ण रात्र त्याचा सुगंध घेतला. त्यानंतर आमची तब्येत अचानक बिघडली. नंतर गाढ झोप लागली. मला खूप विचित्र स्वप्नं पडली. आयुष्यात मी पहिल्यांदाच स्लीप पॅरालिसिसचा अनुभव केला. वेमननं या फुलाबाबत गुगलवर सर्चही केलं. हे फूल म्हणजे एंजल्स ट्रम्पेट (Angel’s Trumpet) होतं. ज्याला डेव्हिल्स ब्रिथ (Devil’s Breath) म्हणूनही ओळखलं जातं. सर्वात खतरनाक असं ड्रग या फुलात असतं. हे फूल विषारी असतं आणि त्याचा सुगंध घेल्यानंतर भ्रम होतात, असं वेमननं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.