Home /News /lifestyle /

वजन कमी करण्यासाठी अतिरिक्त प्रोटीन घेणं थांबवा! नाहीतर गंभीर परिणाम भोगा

वजन कमी करण्यासाठी अतिरिक्त प्रोटीन घेणं थांबवा! नाहीतर गंभीर परिणाम भोगा

लहान मुलं आणि पौगंडावस्थेतील वाढ आणि गर्भधारणा यासारख्या वेगवान वाढीच्या काळात झिंकला विशेष महत्व आहे. अंड्या मधून झिंक मिळतं.

लहान मुलं आणि पौगंडावस्थेतील वाढ आणि गर्भधारणा यासारख्या वेगवान वाढीच्या काळात झिंकला विशेष महत्व आहे. अंड्या मधून झिंक मिळतं.

शरीराला आवश्यक असणाऱ्या इतर घटकांप्रमाणे शरीराला प्रोटीनही (Protein)आवश्यक असतं. मात्र जास्त प्रमाणात प्रोटीन हानिकारक (Harmful)असतं.

    नवी दिल्ली, 1 जुलै : शरीरात पेशींच्या निर्मितीसाठी प्रोटीन (Protein) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण, म्हणून प्रमाणापेक्षा जास्त (Excessive Protein) प्रोटीन घेणंही चांगलं नाही. एका दिवसात शरीरासाठी किती प्रोटीन खायला पाहिजे माहीत असणं महत्वाचे आहे. पुरुषांसाठी दररोज 56 ग्रॅम आणि स्त्रियांसाठी 46 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे. मात्र हे प्रमाणा आपल्या जीवनशैली प्रमाणे कमीजास्त होऊ शकतं. एक्सरसाईज, वजन आणि वयानुसार हे प्रमाण बदलू शकतं. पण, गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शरीरात गेल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम होतात याचीही माहिती जाणून घ्या. शरीरात प्रोटीनची आवश्यकता हाडं,स्नायू,त्वचा आणि केसांसाठीदेखील प्रोटीन आवश्यक असतात. शरीरातील टीशू तयार करण्यासाठी देखील प्रोटीन आवश्यक आहेत. रेड ब्लड सेल्समधील ऑक्सिजन शरीरात वितरित करण्यासाठी प्रोटीन कार्य करतं. शरीरातील आवश्यक पोषक घटकांची कमतरता देखील पूर्ण करतात. (फक्त मिसळा दोनच पदार्थ; तुमचा साधा चहाही होईल इम्युनिटी बुस्टर) आहारातील प्रोटीनचा एक मोठा भाग शरीरात एंझाइम्स तयार करण्यात मदत करत असतो. जेवण पचवण्यात आणि शरीरात केमिकल्स तयार करण्यात मदत करतं. जास्त प्रोटीनचे तोटे  पोटासंबंधी समस्या - प्रोटीन पचायला वेळ लागतो. बर्‍याच वेळा जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यामुळे पचनाचा त्रास होतो. प्रोटीनने आपल्या पचन प्रणालीवर अतिरिक्त दबाव येतो. (अजबच आहे! बॉयफ्रेंडच्या मृतदेहातून स्पर्म घेऊन प्रेग्नंट झाली गर्लफ्रेंड) थकवा जाणवणे - जास्त प्रोटीनमुळे शरीरातील कार्बोहायड्रेड आणि चरबी कमी होते. त्यामुळे जेव्हा प्रोटीन पचण्यास वेळ लागतो तेव्हा शरीराची त्वरित उर्जा गरज भागवली जात नाही. परिणामी आपल्याल अशक्त येतो किंवा थकवा जाणवतो. लूजमोशन्स - शरीरात जास्त प्रोटीन गेले तर, पचायला वेळ लागतो. त्यामुळे लूजमोशन्स होऊ शकतात. परिणामी शरीरातलं पाणीही कमी होतं. वजन वाढतं - वजन कमी करण्यासाठी प्रोटीन घेत असाल आणि त्याबरोबर एक्ससाईज करत नसाल तर, त्यापासून शरीरात चरबी तयार व्हायला लागते. किडनी प्रॉब्लेमग - गरजेपेक्षा जास्त प्रोटीनमुळे किडनी प्रॉब्लेमही होतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या