मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health Tips : वारंवार तहान लागणंही योग्य नाही; या आजारांचे आहेत संकेत, काळजी घ्या!

Health Tips : वारंवार तहान लागणंही योग्य नाही; या आजारांचे आहेत संकेत, काळजी घ्या!

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, शरीराला अनेक संक्रमणांपासून दूर ठेवता येते आणि वजन कमी होते.

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, शरीराला अनेक संक्रमणांपासून दूर ठेवता येते आणि वजन कमी होते.

तुम्हालाही असं जाणवत असेल तर, लक्षणं एकदा तपासून पाहा...

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : अन्नासोबतच पाणीही शरीराला आवश्यक (Water Is Importatnt) असतं. चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. दररोज कमीत कमी 3-4 लिटर पाणी प्यायलं पाहिजे. तहान भागविण्याशिवाय पूर्ण शरीरात ऑक्सिजन खेळता राहण्यासाठीही पाणी पिणं महत्त्वाचं असतं. खाल्लेल्ल्या अन्नाचं पचन होण्यासाठी (Digestion) पाणी प्यायलं पाहिजे. तोंडात लाळ निर्माण होण्यामध्येही पाणी महत्त्वाची भूमिका बजावतं; पण खूप जास्त तहान लागणंही चांगलं नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच तुम्ही खूप जास्त पाणी पीत असाल आणि तरीही तुम्हाला खूप जास्त तहान लागतच असेल तर ते एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. याबद्दल माहिती घेऊ या. 'अमर उजाला'ने याबद्दल अधिक माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तुम्हाला एरव्हीपेक्षा जास्त तहान लागत असेल, तर काळजी घेण्याची खूप गरज आहे. ही डायबेटीस म्हणजेच मधुमेहासारख्या आजाराची सुरुवातही असू शकते. अगदी सुरुवातीलाच या लक्षणाकडे नीट लक्ष दिलं गेलं, तर आजार गंभीर होण्यापूर्वीच त्यावर उपचार करता येतात. अति तहान लागणे हे कोणत्या आजारपणाचं लक्षण असू शकतं याबद्दल वैद्यकीय शास्त्रात काय म्हटलं आहे ते पाहू या. याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे. World Water Day 2022: म्हणून पुरेसं पाणी पिण्याची आपल्या आरोग्याला आहे गरज; अनेक आजार दूर राहतात डिहायड्रेशन जेव्हा शरीरात पाणी कमी होतं म्हणजेच डिहायड्रेशन (Dehydration) होतं तेव्हा खूप प्रमाणात तहान लागते. उऩ्हाळ्यात ही समस्या जास्त भेडसावते. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उन्हात गेल्यानंतर घामाच्या स्वरूपात शरीरातलं पाणी बाहेर टाकलं जातं. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. काही वेळा डिहायड्रेशन गंभीर स्वरूपही धारण करते. त्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. अशा वेळी तहान लागण्याचं प्रमाण जास्त असतं. डायबेटीसचं लक्षण सतत तहान लागणं डायबेटीस (Diabetis) झाल्याचं लक्षणही असू शकतं. जेव्हा रक्तातली शुगर वाढते तेव्हा लघवीच्या माध्यमातून शरीर ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असतं. सतत लघवी होऊनही शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे पुन्हा आणखी तहान लागते. मधुमेह हा एक गंभीर आणि दीर्घकालीन आजार आहे. सतत तहान लागत असल्यास वेळीच तपासणी करून घेतली पाहिजे. Drinking Water : कोणते पाणी असते आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? फिल्टर केलेले की उकळलेले? गरोदरपणात तहान जास्त लागते गरोदरपणात सतत तहान लागते किंवा वारंवार पाणी पिण्याची इच्छा होते. अर्थात ही अवस्था कायम राहिली आणि गर्भावस्था जशी वाढत जाते तशी पाणी पिण्याची वारंवार इच्छा होणं हेही वाढत गेलं तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. सतत म्हणजे अति प्रमाणात तहान लागणे हे गर्भावस्थेतल्या मधुमेहाचं लक्षणही असू शकतं. गरोदरपणात मधुमेहाचा धोका जास्त असतो. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पॉलीडिप्सिया अति प्रमाणात तहान लागणं म्हणजेच पॉलीडिप्सिया होय. पॉलीडिप्सिया सहसा मूत्र म्हणजे लघवीशी संबंधित असते. यामुळे लघवीचं प्रमाण खूप जास्त वाढतं. सतत लघवीला जाण्यामुळे शरीरात द्रव पदार्थांची कमतरता निर्माण होते. ती पूर्ण करण्यासाठी सतत पाणी प्यायलं जातं. कारण सतत तहान लागते. शरीरातल्या प्रक्रियांमुळे खूप जास्त प्रमाणात द्रव पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात. अशा लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे.
First published:

Tags: Drink water, Health Tips, Weak digestive system

पुढील बातम्या