मुंबई, 9 ऑगस्ट : आपल्या शरीराचा सुमारे 70 टक्के भाग पाण्याने बनलेला आहे आणि पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. हायड्रेटेड राहण्याचे आरोग्य फायदे सर्वानाच माहित आहेत. आपण दररोज सहा ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाण्यासोबत तुमच्या दिवसाची अगदी योग्य सुरुवात होते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय राहता. मात्र आपण जे पाणी पितो ते सुरक्षित आणि चांगले असले पाहिजे. यासाठी सरावात मोठा प्रश्न लोकांना पडतो तो म्हणजे, कोणते पाणी पिणे योग्य आहे, फिल्टर केलेले की उकळलेले. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. पाणी पिण्याचे आरोग्य फायदे - मणक्याचे सांधे आणि डिस्कमध्ये आढळणाऱ्या कार्टिलेजमध्ये सुमारे 80 टक्के पाणी असते. त्यामुळे सांधेदुखीपासून वाचण्यासाठी आणि सांधे निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे फार महत्वाचे आहे. - रक्त हे 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते आणि रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. अशा स्थितीत शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ शकतो. - तुम्ही दररोज 2-3 लीटर पाणी पिल्यास त्याचा फायदा त्वचेला आणि केसांना होतो. त्वचा चमकदार होते. त्वचा दीर्घकाळ तरूण राहते. - जर तुम्ही दररोज 8-10 ग्लास पाणी प्यायलात तर तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास जास्त खाणे टाळता येते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
नाश्त्यामध्ये सामील करा हे पदार्थ, मेटाबॉलिजम होईल स्ट्रॉंग आणि वजन होईल कमी- शरीरात अनेक प्रकारचे टाकाऊ पदार्थ साचत राहतात, जे निरोगी राहण्यासाठी काढून टाकावे लागतात. शरीरातून मल आणि मूत्र बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. घाम येण्याच्या प्रक्रियेतही पाण्याची गरज असते. - पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. म्हणून पुरेसे पाणी पिणे फार महत्वाचे आहे. - किडनी हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मूत्रपिंड शरीरातील द्रव नियंत्रित करते. कमी पाणी प्यायल्याने किडनी स्टोन आणि इतर समस्या उद्भवू शकतात. Health Tips: डाएटमध्ये थोडा बदल करा आणि थकवा, सुस्ती घालवा; नाश्त्यामध्ये ‘या’ पदार्थांना करा समावेश फिल्टर केलेले पाणी योग्य की उकळलेले झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला उकळले पाणी पिण्याची सवय असेल आणि त्यासाठी तुम्ही पाणी केवळ 5 ते 10 मिनिटे गरम करत असाल तर ते खूप चुकीचे आहे. नळाचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी ते 60 अंश तापमानात किमान 20 मिनिटे उकळावे लागते. पण तरीदेखील हे पाणी पूर्णपणे स्वच्छ होते का? उकळत्या पाण्यात बॅक्टरीया मरतात, परंतु शिसे, क्लोरीन यांसारखी अनेक घातक रसायने पाण्यात तशीच राहतात. फिल्टर केलेले पाणी उकळलेल्या पाण्यापेक्षा जास्त स्वच्छ मानले जाते. कारण प्युरिफायर सहजतेने शिसे आणि क्लोरीन सारखी घातक रसायने जिवाणूंसह काढून टाकते.