मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमचं बाळ अजूनही बोलत नाही? Tongue Tie असू शकतं कारण

तुमचं बाळ अजूनही बोलत नाही? Tongue Tie असू शकतं कारण

‘टंग टाय’ असेल तर, मुलांना जीभ बाहेर काढता येत नाही. जीभेच्या खालचा वर्टिकल स्क्रीनचा (Vertical Screen) भाग दिसत राहतो. मुलांना जीभ हलवताना, वर-खाली करताना अडचणी येतात.

‘टंग टाय’ असेल तर, मुलांना जीभ बाहेर काढता येत नाही. जीभेच्या खालचा वर्टिकल स्क्रीनचा (Vertical Screen) भाग दिसत राहतो. मुलांना जीभ हलवताना, वर-खाली करताना अडचणी येतात.

‘टंग टाय’ असेल तर, मुलांना जीभ बाहेर काढता येत नाही. जीभेच्या खालचा वर्टिकल स्क्रीनचा (Vertical Screen) भाग दिसत राहतो. मुलांना जीभ हलवताना, वर-खाली करताना अडचणी येतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,07 जुलै: लहान मुलांची वाढ (Children Growth) चांगल्या प्रकारे झाली नाही तर आई-वडिलांचं टेन्शन (Tension) वाढायला लागतं. उपडं पडणं,रांगायला लागणं, हळूहळू उभं राहणं, चालणं आणि बोलायला लागणं या क्रिया मुलांनी योग्य महिन्यात करायाला हव्यात. ही लहान मुलांची वाढ योग्यरितीने होत असल्याची लक्षणं आहेत. आजकाल काही मुलं लवकर बोलत (Kids don’t Talk Early) नाही. मुलींपेक्षा मुलं उशिरा बोलतात. साधारणपणे एक वर्षाचं होईपर्यंत मुलं शब्द उच्चारायला आणि काही ठराविक शब्द बोलायला आणि हळूहळू तुटक-तुटक वाक्यही बोलायला लागतात. मात्र काही मुलं बरीच वर्षे व्यवस्थित बोलू शकत नाहीत. अशा वेळेस त्या मुलांमध्ये ‘टंग टाय’ (Tongue Tie) हा त्रास असू शकतो. आपण सहजपणे आपली जिभ तोंडामध्ये फिरवू शकतो आणि त्यामुळेच बोलताना शब्दांचे उच्चार (Pronunciation)करता येतात. मात्र या मुलांमध्ये ‘टंग टाय’ ही समस्या जन्मापासून असते. पण, त्यामुळे बोलताना, दूध पितांना, जेवताना, पदार्थ गिळताना देखील त्रास होतो. हा त्रास वेळीच लक्षात आला तर त्यावर योग्य उपचार करता येऊ शकतात.

टंग टा म्हणजे नेमकं काय ?

‘टंग टाय’ म्हणजेच जिभेचा तंतू (Frenulum) खुप छोटा असतो आणि त्यामुळे मुळे जिभेचा खालचा भाग त्याला चिकटलेला असतो. त्यामुळे जिभेची हालचाल जास्त होत नाही.

टंग टाची लक्षणं

‘टंग टाय’ असेल तर, मुलांना जीभ बाहेर काढता येत नाही. जीभेच्या खालचा वर्टिकल स्क्रीनचा (Vertical Screen) भाग दिसत राहतो. मुलांना जीभ हलवताना, वर-खाली करताना अडचणी येतात. काही मुलं जीभ आजूबाजूलाही फिरवू शकत नाहीत. जिभेचा आकारही छोटा असतो. बाळांना दूध पिताना पदार्थ करताना अडचणी येतात.

टंग टामुळे येणाच्या अडचणी

‘टंग टाय’ असल्यमुळे मुलांना दूध पिताना स्तनाग्र तोंडात पकडणं शक्य होत नाही आणि त्यामुळे मुळे मुलं चिडचिड करतात. दूध पिताना मुलांच्या तोंडामधून क्लिकिंग साऊंड येत राहतो. भुक पूर्ण होत नसल्यामुळे मुलांचं वजन कमी व्हायला लागतं. मुलांना दूध पितापिता झोप लागते. मुलांना दूध पाजतांना आईच्या स्तनाग्रमध्ये वेदना होतात आणि दूधही कमी येतं. मुल बाटलीने दूध पित असेल तर, बाटलीच्या आतमध्ये जास्त प्रमाणात हवा भरली जाते. काही खाताना, गिळताना अडचणी येतात. अशी मुलं बोलू शकत नाहीत जिभ हलवताना त्यांना त्रास होतो. आपल्या मुलांमध्ये अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर, डॉक्टरांचा सल्ला तात्काळ घ्यायला हवा.

टंग टायचं कारण

‘टंग टाय’ असण्याचं मुख्य कारण सांगता येऊ शकत नाही मात्र, ही जेनेटिक (Genetic)समस्या असू शकते. ज्या मुलांच्या पालकांना टंकायचा प्रॉब्लेम असतो त्यांच्या मुलांमध्ये देखील ही समस्या येऊ शकते. कधीकधी जेनेटिक हिस्ट्रीशिवायही मुलांना असा त्रास होऊ शकतो

टंग टायवरील उपचार

ज्या मुलांमध्ये तंतू म्हणजेच फ्रेनुलम (Frenulum) जास्त जाड असतो. त्यांची फ्रेनुलो प्लास्टी (Frenulum Plasty) केली जाते. या मुलांना बेशुद्ध करून त्यांची सर्जरी केली जाते किंवा फ्रेनोटॉमी म्हणजेच लहान मुलांच्या जिभेच्या खालच्या छोट्या भागाला कात्रीने चिर दिली जाते.

First published:

Tags: Childhood struggle, Health, Lifestyle, Parents and child, Small child, Wellness