Home /News /lifestyle /

फक्त 2 पदार्थामुळे फटाफट चरबी होईल कमी; पोटाचा घेरातही दिसून येईल परिणाम

फक्त 2 पदार्थामुळे फटाफट चरबी होईल कमी; पोटाचा घेरातही दिसून येईल परिणाम

चरबी कमी करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी हे पदार्थ जरूर घ्या.

चरबी कमी करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी हे पदार्थ जरूर घ्या.

खुप प्रयत्न करूनही पोटावरची चरबी (Belly Fat) कमी होत नाही. आवडते कपडे घालता येत नाहीत तर, रोज रात्री सोप करा या सोप्या टिप्स (Tips).

    नवी दिल्ली, 12 जुलै : कितीतरी जणांना वाटतं की, आपण सडपातळ असावं. वजन कमी (Weight loss) करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. डॉक्टरांची औषधं, सल्ले ऐकतात. खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. व्यायाम करातात, जॉगिंग करतात. पण, वजन आटोक्यात येत नाही. आजच्या काळात वजन वाढणे (Weight Gain) ही सर्वसामान्य समस्या बनलेली आहे. स्थूल शरीरामुळे आजारीही येतात आणि आत्मविश्वासा (Confidence) वरही परिणाम होतो. आवडीचे कपडे घालता येत नाहीत. एकाच ठिकाणी बसून काम करणं, शारीराची हालचाल कमी असणं, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे काहीजणांना वजन वाढीच्या समस्येचा सामना करतात. वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं. भविष्यामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी वजन नियंत्रणात (Weight control) असणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेली चरबी हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे वाढत्या वजनाचा बरोबर पोटाचा घेर देखील वाढायला लागतो आणि त्यामुळे शरीराच्या इतर भागांपेक्षा पुढे आलेले पोट जास्त दिसायला लागतं. सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे बरेच जण एकाच ठिकाणी बसून काम करतात एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे देखील वजन वाढतं. जेवल्या जेवल्या झोपण्याची सवय अतिशय वाईट असते. (या आहेत गर्भनिरोधकांच्या विविध पद्धती, कोणत्या ते पाहा) काहीजणांना तळलेले मसालेदार पदार्थ खायला आवडतात. मद्यपान आणि धूम्रपान हे देखील चरबी वाढण्याचे एक कारण आहे. डायटिंग किंवा एक्ससाइज करून वजन कमी करता येतं पण, पोटावरची चरबी लवकर कमी होत नाही. त्यासाठी काही होम रेमेडीज तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे पोटावरची चरबी पटापट वितळून जाईल. केवळ झोपण्याआधी दोन पदार्थ घेतल्यास पोटावरची चरबी वितळून जाऊ शकते. पाहुयात कोणते आहे ते दोन पदार्थ. (कोरोनानंतर Bell's Palsy चा धोका; चेहऱ्यावर अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नका) दालचिनीचा चहा डॉक्टरांच्या मते दालचिनी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या किचनमध्ये सहजपणे उपलब्ध असते. मसाल्याच्या पदार्थात दालचिनीचा वापर केला जातो. दालचिनीचा चहा वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातली चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. दालचिनीमध्ये ऍन्टीऑक्सिडंट आणि ऍन्टीबायोटिक गुण आहेत. ज्यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होऊ शकतं. त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक कप दालचिनीचा चहा पिण्याने पोटाचा घेर कमी व्हायला लागेल. (आठवड्याभरात वजन कमी करायचंय? फॉलो करा या 6 सोप्या टिप्स) हळदीचं दूध वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध प्यायला हवं. हळद सर्दी, खोकला यासारख्या व्हारल इंनफेक्शन मध्ये उपयोग येते. शिवाय हळदीमुळे पचन सुधारून वजन देखील कमी व्हायला लागतं. हळदीत ऍन्टीऑक्सीडेंट भरपूर असतं. ज्यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर फेकले जातात. हळदीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन असतं. ज्यामुळे झोप चांगली लागते आणि वजन कमी होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Home remedies, Weight gain, Weight loss

    पुढील बातम्या