मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मायग्रेनकडे दुर्लक्ष पडू शकतं महागात, ही आहेत मुख्य लक्षणं, ओळखत वेळीच घ्या उपचार

मायग्रेनकडे दुर्लक्ष पडू शकतं महागात, ही आहेत मुख्य लक्षणं, ओळखत वेळीच घ्या उपचार

आरोग्याच्या अनेक समस्या आपण हलक्यात घेत असतो. मात्र ही सवय चांगली नाही.

आरोग्याच्या अनेक समस्या आपण हलक्यात घेत असतो. मात्र ही सवय चांगली नाही.

आरोग्याच्या अनेक समस्या आपण हलक्यात घेत असतो. मात्र ही सवय चांगली नाही.

मुंबई, 1 मार्च : अनेकदा आपण शरीरात होत असलेल्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष करतो. डोकेदुखी झाली तर पेन किलर खातो. डोळ्यात काही समस्याच जाणवली तर ड्रॉप टाकून घेतो. याची कारणं अनेक असू शकतात. (health tips)

जसं की, हा त्रास सामान्य आहे असं समजणं, डॉक्टरकडे जाण्याची इच्छा नसणं, बिझी शेड्युल असणं. मात्र अनेकदा या दुर्लक्षातून मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. असाच एक आजार आहे मायग्रेन. मायग्रेनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं. त्यामुळं वेळीच ही लक्षणं ओळखत दुर्लक्ष न करता डॉक्टरशी संपर्क करणं गरजेचं आहे. (how to deal with migraine problem)

मायग्रेन तुमच्या आरोग्याच्या स्थितीवरसुद्धा प्रकाश टाकतं. मायग्रेनचं कारण दमा, नैराश्य किंवा हृद्यासंबंधीचे आजार हेसुद्धा असू शकतं. इथं सांगितल्या जाणाऱ्या लक्षणांमधलं कुठलं लक्षण तुमच्यात दिसत असेल किंवा तुम्हाला असं काही वाटत असेल तर त्याकडं दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी जरूर संपर्क करा. (Migraine and its causes)

हेही वाचा सोशल मीडियाबाबत नियम घालणारा भारत नाही पहिला देश; वाचा जगभरातले कायदे

मायग्रेनची मुख्य लक्षणं (symptoms of migraine)

मायग्रेनचं मुख्य लक्षण आहे डोकं खूप जास्त दुखणं. कुणाचं डोकं पूर्ण दुखू शकतं तर कुणाचं अर्धं. ही डोकेदुखी हालचाल केल्यानं वाढूही शकते. खूप प्रकाशात डोकेदुखी वाढणं, सोबतच प्रकाशाची भीती वाटणं. यात डोकेदुखीसह मानेतही दुखतं. काही-काही लोकांना डोकेदुखीसह मन घाबरणं आणि उलटीचाही त्रास होऊ शकतो. (how to detect Migraine)

हेही वाचा किडनी स्टोन रोखण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना, आहारात करा 'हे' बदल

डोकं दुखत असताना शांतपणे एखाद्या अंधाऱ्या जागी पडून राहण्याची इच्छा होणं. अशक्तपणा, चक्कर येणं आणि घाम येणं हेसुद्धा यात दिसतं. कधी खूप थंड तर कधी खूप गरम वाटतं. दिसण्याशी संबंधित त्रासही होऊ शकतात. जसं की, झोपून उठल्यावर भिंतीवर धूसर डाग दिसणं. डोळ्यांसमोर धागे पडत असल्याची भावना होणं. सोबतच नजरेसमोर खूप प्रकाश किंवा वाकड्यातिकड्या रेषा दिसणं.

(Disclaimer - या लेखात दिलेली सगळी माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारलेल्या आहेत. news 18 Marathi याला दुजोरा देत नाही. याची अमलबजावणी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Health, Health Tips, Pain, Problems