जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे? तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस

अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे? तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस

तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणं, गॅसेस वाढणं असे त्रास होतात.

तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणं, गॅसेस वाढणं असे त्रास होतात.

Diet Plan For Gastric Patient: Acidity आणि गॅसची समस्या असणाऱ्या लोकांनी काय खावं, काय खाऊ नये आणि डाएट प्लॅन (diet plan) कसा असावा?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 23 जून: खाण्या-पिण्यावर लक्ष न दिल्यामुळे अनेकांना अॅसिडिटी (Acidity) आणि गॅस्ट्रिक (Gastric) त्रास होतो. हा त्रास जरी सामान्य असला तरी काही वेळा परिस्थिती गंभीर होऊ शकते. गॅस आणि अॅसिडिटी होण्याचं मुख्य कारण तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाणं हे असतं. त्यामुळे या त्रासांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर खाण्या-पिण्यात बदल करणं गरजेचं आहे. अॅसिडिटी आणि गॅसची समस्या असणाऱ्या लोकांनी (Diet Plan For Gastric Patient) काय खावं, काय खाऊ नये आणि डाएट प्लॅन (diet plan) कसा असावा, याबद्दल जाणून घेऊया. केळी खा - केळी (banana) शरीरासाठी खूप हेल्दी असते. त्यात कॅल्शियम आणि आयरनचे प्रमाण देखील जास्त असते. केळी अँटी-ऑक्सिडंट आणि पोटॅशिअमयुक्त असल्याने अॅसिड रिफ्लॅक्स कमी करतं त्यामुळे पोटात गॅस होत नाही. याशिवाय केळी पोटाच्या लायनिंगवर म्यूकस तयार करतात, त्यामुळे pH स्तर कमी होतो. केळीमध्ये फायबर असल्याने अॅसिडिटी कंट्रोल होण्यास मदत होते. टरबूज खाण्याचे फायदे - टरबूज ( water melon) शरीरातील पाण्याची कमी पूर्ण करते. तसेच टरबूजचं सेवन केल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि गॅस तयार होतं नाही. 7 Super foods करतील तुमच्या ब्रेस्टचं रक्षण; Breast cancer पासून करतील बचाव केळी प्रमाणेच टरबूजमध्येही फायबर असतं ते जेवण पचवण्यास मदत करतं. जेवण पचल्यास गॅसचा त्रास होत नाही. त्यामुळे टरबूजचे सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. काकडी खाण्याचे फायदे - काकडी खाल्ल्यास दिवसभर पोट थंड राहतं. काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. काकडी खाल्ल्याने डिहायड्रेशन होत नाही. तसेच अॅसिड रिफ्लॅक्स कमी होतं त्यामुळे अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होत नाही. नारळ पाणी प्या - सकाळी चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर पोट फुगण्याचा त्रास अनेकांना जाणवतो. पोट फुगल्यानंतर गॅस तयार होतो. अशा लोकांनी नारळपाणी प्यायला हवं. सकाळी नारळपाणी पिल्यास शरीर डिटॉक्सिफाय होतं. सावधान!लहान बाळांच्या डोळ्यात काजळ घालू नका;होतो मेंदूवर परिणाम तसेच नारळ पाण्यात फायबर आणि अँटि-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शरीराची पाचनक्रिया व्यवस्थित राहते. नारळ पाणी प्यायल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटकारा मिळतो. एक ग्लास थंड दूध प्या - दूध प्यायल्याने हाडं मजबूत होतात. तसेच पोटाचे विकारदेखील दूर होतात. सकाळी एक ग्लास थंड दूध प्यायल्यास पोटात जळजळ होत नाही. शिवाय दूध प्यायल्याने वारंवार भूक लागत नाही आणि दिवसभर पोट थंड ठेवते. त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटी होत नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात