दिल्ली,17 जुलै : तूप हा पोषणयुक्त पदार्थ (Nutritious Food) आहारात असायलाच हवा असा सल्ला सगळेजण देतात. मात्र, बाजारत मिळणाऱ्या तुपापेक्षा घरी बनवलेल तूप (Home Made Ghee) जास्त शुद्ध आणि चांगलं असतं. त्यामुळे बऱ्याच महिलांना तूप विकत आणण्यापेक्षा घरीच बनवायला आवडतं. कधीकधी वेळेअभावी किंवा तूप बनवण्याच्या झंझटमुळे वैतागून बाहेरून तूप आणलं तरी त्याला तितकी चव आणि शुद्धतेची (Taste & Purity) खात्री नसते. म्हणून काही गृहिणी घरीच तूप बनवतात.
साय साठवून त्यापासून तूप बनवणं तसं बरंच मेहनतीचं काम (Hard work) आहे. आठवडाभर साय साठवून त्यापासून चांगलं तूप निघालं नाही तर, फार वाईट वाटतं. तुम्हाला पण घरच्या घरी साठवलेला साईपासून तूप बनवायचं असेल तर काही सोप्या टीप्स नक्की फायदेशीर ठरतील.
तूप काढण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे फुल क्रीम दूध वापरणं. दूध उकळून थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावं. त्यामुळे दुधावर जाड साय येते. ही साय काढून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवावी. ठराविक आकाराच्या डब्यामध्ये दररोज साय साठवून आठवडाभराने किंवा पंधरा दिवसांनी त्यापासून तूप करावं. 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवू नये.
(Suction Cup Fish : या माशाची KISS आहे खूप लकी; किस करताच चमकेल तुमचं नशीब)
ज्या दिवशी तूप काढायचं असेल त्या दिवशी साईचा डबा फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावा. डब्यातली साय नरम झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचं लोणी काढून घ्यावं. याशिवाय हाताने देखील लोणी काढता येतं. मोठ्या भांड्यांमध्ये साय घालून हाताने गोलाकार फिरवून त्यापासून लोणी निघेपर्यंत थोडथोड पाणी घालून ढवळत राहावं.
(असा असावा वाढत्या वयात आहार;बाळाचं वजन वाढेल फटाफट)
हा लोण्याचा गोळा मोठ्या भांड्यामध्ये घालून 2 मिनिटं मोठ्या आचेवर गरम होऊ द्यावा. यानंतर गॅस बारीक करावा. लोण्यापासून तूप निघायला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी. तूप सुकून बाहेर निघायला लागलं की, त्यामध्ये 1 चमचा पीठ आणि 2 चिमूट मीठ घालावं. तूप लगेच वेगळं व्हायला लागेल.
(घरी कुंडीतसुद्धा लावू शकता रुद्राक्षाचं रोप; परदेशातही आहे मोठी मागणी)
तुपाची बेरी गुलाबी रंगाची झाल्यानंतर गॅस बंद करावा. तूप गरम असताना गाळून घ्यावं. तूप गाळण्यासाठी सुती कापडाचा किंवा गाळणीचाही वापर करू शकता. हे तूप फ्रिज मध्ये ठेवावं किंवा बाहेर ठेवलं तरी चांगलं टिकू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Easy hack, Home remedies, Lifestyle, Tips