नवी दिल्ली, 29 जून : आपण कधी ना कधी ऍक्युप्रेशर आणि ऍक्युपंचर
(Acupressure & Acupuncture) ही नावं ऐकलेली असतील. अनेक आजारांवर
(Diseases) या पद्धतीचा वापर केला जातो. हे देखील माहिती असेल. मात्र, या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? ऍक्युप्रेशर किंवा ऍक्युपंचर या चीनी चिकित्सा पद्धती
(Chinese Medical Practices) आहेत. 6 हजार वर्षापासून जगभरामध्ये त्या फॉलो केल्या जातात. ऍक्युप्रेशर किंवा ऍक्युपंचरने अनेक आजारांवर उपचार केले जातात. या उपचारांचा परिणाम होण्यास वेळ लागत असला तरी त्याचे साईड इफेक्ट
(No Side Effect)होत नाहीत.
ऍक्युपंचर
ऍक्यु हा चिनी भाषेतला एक शब्द आहे. ज्याचा अर्थ पॉईंट असा होतो. आपल्या शरीरामध्ये 365 एनर्जी पॉईंट असतात. या एनर्जी पॉईंटवर अगदी बारीक सुईने पंक्चर म्हणजे छेद केला जातो. यामुळे त्याला ऍक्युपंचर म्हटलं जातं. ऍक्युपंरला मेडिकल सायन्समध्ये देखील महत्त्व आहे. WHOने ऍक्युपंचर थेरपीला मान्यता दिलेली आहे.
(
तुम्हाला माहिती आहे का? सतत हवासा वाटणारा स्मार्टफोन तुमचं लैंगिक सुख हिरावतोय)
ऍक्युप्रेशर
ऍक्युप्रेशरमध्ये अंगठा आणि बोटांच्या सहाय्याने शरीरावरच्या काही बागावर दबाव टाकला जातो. यामुळे शरीरातील काही नसा ऍक्टिव्ह होतात. ऍक्युप्रेशरमध्ये 2 ते 3 मिनिटं पॉईंट दाबून ठेवतात. ही पद्धत आपण स्वतः शिकवून उपचारांमध्ये वापरू शकतो. 5 ते 6 सेशन्सनंतर याचे फायदे दिसायला लागतात. याकरता 15 ते 20 सीटिंग घ्यावे लागतात.
(
काय सांगता! फक्त झोपूनही घटू शकतं वजन; पूर्ण होईल स्लीम ट्रिम होण्याचं स्वप्न)
विविध आजारांवर उपचार
ऍक्युप्रेशर आणि ऍक्युपंचर यांच्या वापराने वेदना,पाठीदुखी,मानदुखी, संधीवात, मायग्रेन यासारखे त्रास बरे होतात. याशिवाय इमोशन्स डिसॉर्डर म्हणजेच एन्जायची आणि डिप्रेशन यावर देखील प्रभावी आहे. मात्र, याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या टिप्स फॉलो करा.
आपल्या शरीरामध्ये एकूण 365 पॉईंट असतात. ज्याचा प्रभाव पूर्ण शरीरावर होत असतो.
दिवसभरामध्ये 10 ते 15 मिनिटं अनवाणी चालण्याने तळ्यांमधील पॉईंट्स दाबले जातात आणि शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं.
(
पावसाळ्यात साखर, मिठाला सुटलं पाणी; या टीप्स फॉलो करा बिलकुल खराब होणार नाही)
आठवड्यातून 2 वेळा 5 ते 10 मिनिट तेलाने चांगल्या प्रकारे पायांना मसाज करा. डिप्रेशन मेमरी लॉस पार्किन्सन्स सारख्या आजारांमध्ये याचा फायदा होतो.
कानाच्या खालच्या भागांमध्ये रोज 5 मिनिटं मॉलिश केल्याने स्मरणशक्ती चांगली होते.
अंघोळीच्या वेळी तळव्यांना 4 ते 5 मिनिटं ब्रशने घासावं.
आपली जीभ दररोज ब्रश किंवा बोटांच्या सहाय्याने घासावी. जिभेवर हार्ट, किडनी यांचे पॉईंट असतात.
दररोज 5 ते 7 मिनिटं टाळ्या वाजवा. हातामध्ये एक्यूप्रेशर पॉइंट असतात. टाळ्या वाजवण्याने हे पॉइंट दाबले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.