मुंबई, 25 मार्च : निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहारासोबतच नियमित व्यायामसुद्धा पाहिजे. अनेक डॉक्टर तसा सल्ला देतात; मात्र व्यायाम ही कायमस्वरूपी करण्याची गोष्ट आहे. व्यायाम अचानक सुरू करणं किंवा अचानक बंद करणं दोन्हीही घातक असतं. तसंच मर्यादेपेक्षा जास्त व्यायाम करणंही त्रासदायक ठरू शकतं. चीनमध्ये याचं एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. वयाच्या चाळिसाव्या वर्षापासून एका व्यक्तीने व्यायाम करायला सुरुवात केली. दिवसभरातले 8 तास तो विविध व्यायाम करायचा. आता 20 वर्षांनंतर मात्र तो चालूही शकत नाही. माणसाच्या शरीराला व्यायामाची गरज असते; मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार व्यायामाचे प्रकार आणि कालावधी याचं प्रमाण बदलतं. कोणताही सल्ला न घेता आपल्या मनानं व्यायाम करणं महागात पडू शकतं. अगदी जिवावरही बेतू शकतं. एका चिनी व्यक्तीला असाच फटका बसला आहे.
फ्रीजमध्ये असतात 18 लाखांहून अधिक बॅक्टेरिया! काळजी न घेतल्यास होऊ शकतात हे गंभीर संसर्गऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, शँग्जी डेली या चिनी वृत्तपत्राने चीनमधल्या या 60 वर्षीय व्यक्तीविषयी वृत्त दिलं आहे. सध्या ती व्यक्ती चालूही शकत नाही; मात्र ही परिस्थिती त्याच्यावर वयोमानामुळे ओढवलेली नाही, तर अतिरेकी व्यायामामुळे झाली आहे. चाळिसाव्या वर्षी त्याने व्यायाम करायला सुरुवात केली.
जेंग्जू इथं राहणाऱ्या त्या चिनी व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त व्यायाम केला. सकाळी अडीच तास तो फिरायचा किंवा धावायचा. सोबत पुलअप्सही करायचा. त्यानंतर 2 तास तो पोहायला जायचा. एका दिवसात तो 800 सीटअप्स करायचा. तसंच दिवसाला 100 पुशअप्स तो करत होता. त्याशिवाय बॅडमिंटनही खेळायचा. इतक्या सगळ्या व्यायामामुळे हळूहळू त्याचे सांधे दुखू लागले. अशा पद्धतीचा व्यायाम खरं तर फिटनेस ट्रेनरच करू शकतात. त्यामुळे खरोखर तो इतका व्यायाम करायचा का याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही; मात्र सातत्यानं गेली 20 वर्षं तो असा व्यायाम करत होता. त्यामुळे त्याची कोपरं व गुडघे दुखू लागले. सांधेदुखी इतकी वाढली, की त्याला चालणंही शक्य होईना. तेव्हा कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेलं. तपासण्या केल्यावर त्याला डीजनरेटिव्ह आर्थ्रायटिस झाल्याचं लक्षात आलं. तसंच त्याला हायपरप्लेसिया झाल्याचं निदान होऊन, कोपरांच्या सांध्यातल्या पेशी नष्ट झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सोशल मीडियावरून नागरिकांना व्यायामाबाबत सल्ला दिला. नागरिकांनी सोप्या व्यायामापासून सुरुवात करावी, तसंच दिवसातून एक ते दीड तासच व्यायाम करावा असं डॉक्टरांनी त्यात म्हटलंय.
रक्तवाहिन्या स्ट्रॉन्ग बनवतात ‘हे’ पदार्थ! नियमित खाल्यास कधीच होणार नाही रक्ताची कमतरता(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)