कोरोनामधून बरं झाल्यानंतरही धोका कमी होत नाही. कोरोना पेशंट बरा झाल्यानंतर शरीरातल्या कमी झालेल्या प्लेटलेट्स अनेक आठवडे कमीच राहतात. व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होतात आणि काही आठवड्यांनी वाढतात देखील. मात्र कोरोनाच्या बाबतीत तसं नाहीये.
बरेच दिवस ब्लड प्लेटलेट्स कमी असतील तर, डॉक्टरकडे धाव घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टंन्ट डॉक्टर अतुल गोगिया यांच्यामते कोरोनामधूव रिकव्हर झालेल्या काही रुग्णांमध्ये ब्लड प्लेटलेट्स खुप कमी म्हणजे 10,000-20,000 असल्याचं दिसून आलं आहे.
एका 85 वर्षांच्या कोरोना रुग्णाच्या प्लेटलेट्स 2,000 राहिल्याने त्यांच्या शरीरामधून रक्त वहायला सुरूवात झाली होती. अशावेळेस स्टेरॉईड हाच उपचाराचा पर्याय आहे.
तर, दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलच्या इंटरनस मेडिसिन डायरेक्टर डॉक्टर रोमेल टिक्की सांगतात की, सामान्यपणे 1,50,000 ते 4,00,000 प्रति माइक्रोलीटर प्लेटलेट्स असणं आवश्यक आहे. पण, कोरोनामुक्त रुग्णांमध्ये 1,00,000 ते 1,50,000 एवढ्याच प्लेटलेट्स असतात. 50,000 पेक्षा कमी प्लेटलेस्टस झाल्यास तात्काळ उपचार घ्यायला हवेत.तर, दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलच्या इंटरनस मेडिसिन डायरेक्टर डॉक्टर रोमेल टिक्की सांगतात की, सामान्यपणे 1,50,000 ते 4,00,000 प्रति माइक्रोलीटर प्लेटलेट्स असणं आवश्यक आहे. पण, कोरोनामुक्त रुग्णांमध्ये 1,00,000 ते 1,50,000 एवढ्याच प्लेटलेट्स असतात. 50,000 पेक्षा कमी प्लेटलेस्टस झाल्यास तात्काळ उपचार घ्यायला हवेत.
डांग लॅबचे संस्थापक आणि कन्सलटंट माइक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर नवीन डांग सांगतात कोरोना रिकव्हरीनंतर ब्लड प्लेटलेट्स 1,00,000 ते 1,50,000 झाल्यास घाबरून जाऊ नये.
पांढऱ्या आणि लाल रक्तपेशी म्हणजे प्लेटलेट्स, शरीरातील रक्त प्रवाभात त्यांची महत्वाची भूमिका असते. इन्फेक्शन बर करण्यासाठी आणि रक्त पातळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळेही प्लेटलेट्स कमी होऊ शकतात.
कोरोना आपल्या रोग प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो त्यामुळे प्लेटलेट्स कमी होतात. गेल्यावर्षी पहिल्या लाटेत चीनमध्ये एका 49 वर्षीय महिलेला कोरोना बरा झाल्यानंतर 4 महिने प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या झाली होती.
प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर, आहारामध्ये पपई,पालक, किवी,टोमॅटो आणि ब्रोकोली खायला सुरूवात करा. त्यामुळे प्लेटलेट्स वेगाने वाढतील. पण, प्लेटलेट्स खुप कमी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.