मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हे चणे आहेत ‘Super Food’; डायबेटीज आणि वजन येईल नियंत्रणात

हे चणे आहेत ‘Super Food’; डायबेटीज आणि वजन येईल नियंत्रणात

प्रोटीनचा मोठा स्त्रोत असूनही चण्यांकडे दुर्लक्षच होतं. 100 ग्रॅम चण्यात 15 ग्रॅम प्रोटीन आहे.

प्रोटीनचा मोठा स्त्रोत असूनही चण्यांकडे दुर्लक्षच होतं. 100 ग्रॅम चण्यात 15 ग्रॅम प्रोटीन आहे.

दररोज चणे किंवा हरभरे खाल्ल्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे (Chickpeas Benefits) मिळतात. डायबेटीस (Diabetes) आणि हृदय रोगाचा त्रास असलेले रुग्णांनी विशेषतः काळे चणे खावेत.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 29 जून :  काळे चणे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits Of black gram)आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्स बरोबरच व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन डी, व्हिटॅमीन के आणि फॉस्फरस, पोटॅशियम असतं. त्यामुळेच सकाळच्या नाश्त्यात काळे चणे  खायला सुरुवात करावी. यामुळे शरीर स्ट्रॉंग होतं, मेंदू तल्लख होतो. हृदय आणि त्वचाही निरोगी राहते. तर, जाणून घेऊयात काळे चणे खाण्याचे फायदे.

डायबिटीज

काळे चणे डायबिटीज रुग्णांसाठी सुपर फूड मानले जातात. एक मुठ चण्यांमध्ये 13 ग्रॅम डायटरी फायबर असतं. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल मध्ये येते. यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. मधुमेहाचे रुग्ण किंवा शरीरात वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी काळे चणे दररोज खावेत.

(स्ट्रेस फ्री जगायचंय? लवकर उठावं लागेल; ही 8 कारणं वाचाच)

वजन कमी करण्यासाठी

चण्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्याची क्षमता असते. काळे चणे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यात मदत होते. यातील फायबर वेट लॉससाठी उपयोगी आहे. यातील न्युट्रिशन्ल व्हॅल्यू मिळवण्यसाठी सॅलडमध्ये वापरा.

(केवळ अतिखाण्यानेच नव्हे तर जास्त पाणी पिण्याने आणि कमी खाण्यानेही वाढतं वजन)

निरोगी हृदय

यामध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टिऑक्सिडन्ट असतात. ज्यामुळे हृदयासाठी फायदेशीर आहेत.या मधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहतं.

(झोपा नाहीतर मृत्यू येतोय! संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब)

बद्धकोष्टता दूर होते

काळा चण्यांमधील फायबर पचण्यासाठी हलकं असतं. दररोज चणे खाल्ल्यामुळे पोटासंदर्भातले आजार कमी होतात. काळे चणे कच्चे किंवा उकडून खाऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

First published:

Tags: Diabetes, Health Tips