नवी दिल्ली,12 जुलै : बाळाच्या जन्माबरोबर आईचा नवीन जन्म होतो असं म्हणतात. म्हणूनच गर्भधारणेचा काळ
(Pregnancy) प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्वाचा असतो. डिलिव्हरीनंतर
(After Delivery) शरीरात जे बदल होतात त्या करता महिलांनीदेखील स्वतःची काळजी घ्यावी लागते. बाळाप्रमाणे आईच्या शरीराची व्यवस्थित काळजी
(Care) घेतली नाही तर, आयुष्यभरासाठी काही समस्या निर्माण
(Health Issue) होतात. त्यामुळेच महिलांना पोषक आहाराबरोबर
(Healthy Diet) काही घरगुती उपायांचाही
(Home Remedies) उपयोग करता येऊ शकतो. आयुर्वेदानुसार
(Ayurveda) गर्भधारणेच्या काळात आणि त्यानंतर महिलांना ओव्याचं पाणी
(Ova Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. ओव्यांमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडन्ट आणि जळजळ कमी करणारे घटक असतात. ज्यामुळे ओवा सर्दी,खोकला आणि सायनस सारख्या आजारातही फायदेशीर असतो. महिलांसाठी डिलिव्हरीनंतर ओव्याचं पाणी पिण्याचे भरपूर फायदे आहेत.
गॅसेस कमी होतात
गर्भधारणेच्या काळात महिलांना गॅस होण्याची समस्या होते. पोटातील गॅसची समस्या कमी करायची असेल,पचन चांगलं करायचं असेल तर ओव्याचं पाणी फायदेशीर आहे.
(
फक्त 2 पदार्थामुळे फटाफट चरबी होईल कमी; पोटाचा घेरातही दिसून येईल परिणाम)
रक्त वाढीसाठी
ओव्याचं पाणी पिण्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह चांगला झाल्यामुळे गर्भवती महिलांना कोणतेही त्रास होत नाहीत.
(
दररोज ‘या’ भाज्या आणि फळं खा; थायरॉईड येईल नियंत्रणात)
आईच्या दुधासाठी फायदेशीर
ज्या महिलांना बाळांना स्तनपान करताना अडचण असते. त्या महिलांना ओव्याचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ओव्याचं पाणी पिण्यामुळे आईचं दूध वाढतं, दुधाची क्वालिटीही चांगली होते.
वजन कमी करण्यासाठी
डिलिव्हरी नंतर वजन वाढणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ठरतो. वजन कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे मेटबॉलिजम वाढतं आणि त्यामुळे कार्बोहायड्रेट आणि चर्बी कमी होते.
(
जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे; कधीच लागणार नाही चष्मा)
मासिक पाळीच्या समस्या
मासिक पाळीच्या काळामध्ये कंबर आणि पोटाच्या खालच्या भागांमध्ये वेदना होत असतील तर, ओव्याचं पाणी पिण्याने फायदा होतो. याशिवाय कोमट पाण्याबरोबर ओवा चाऊन खाल्ला तर वेदना कमी होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.