Home /News /lifestyle /

साधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा

साधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा

बदामाच दुधही डायबेटीज पेशंट पिऊ शकतात. गाईच्या दुधापेक्षा यात कॅलरीज कमी असतात. तर, व्हिटॅमीन डी, ई, प्रोटीन आणि फायबर असतं. त्यामुळे रक्तात ग्लुकोज एब्जॉर्ब होण्याची क्रिया संथ होते.

बदामाच दुधही डायबेटीज पेशंट पिऊ शकतात. गाईच्या दुधापेक्षा यात कॅलरीज कमी असतात. तर, व्हिटॅमीन डी, ई, प्रोटीन आणि फायबर असतं. त्यामुळे रक्तात ग्लुकोज एब्जॉर्ब होण्याची क्रिया संथ होते.

अनेकांना गाईचं दूधही पचत नाही. म्हशीचं दूध बाधतं, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात. हा दुधाचा पर्याय त्या सर्वांसाठी चांगला..

    दिल्ली,17 जून: बदामाचं दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर(Health Benefits of Almond Milk)आहे. अतिशय पौष्टिक आणि लो-कॅलरी असलेलं हे दूध आजकाल आरोग्य प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. बदामांमध्ये असलेलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमीन के, व्हिटॅमीन ई,प्रोटीन,झिंक आणि कॉपर शरीरासाठी अतिशय चांगलं मानलं जातं. यातील पोषक घटक शरीर निरोगी (Immunity Booster)ठेवतात आणि त्वचेच सौंदर्य आणि केसांसाठीही (Skin & Hair) फायदेशीर असतात. ज्यांना गाईचं दूध पचत नाही त्यांच्यासाठी बदाम दूध एक चांगला पर्याय आहे. हे चवीलाही चांगलं असतं. कसं करायचं? 1 ग्लास पाणी घ्या आणि त्यात काही बदाम घाला. मिक्सरला त्याची पेस्ट तयार करा. वाटल्यास गाळून घ्या. दिसायला हे गायीच्या दुधासारखंच दिसतं. पण, त्यात गायीच्या दुधापेक्षा कमी कॅलरीज (Low Calories)असतात. जाणून घेऊयात बदाम दुधाचे फायदे. वजन कमी होतं बदामांमध्ये जास्त कॅलरीज असतात असा काहींचा समज असतो. पण योग्य प्रकारे वापरल्यास लो-कॅलरी ड्रिंक तयार करता येतं. ज्या लोकांना लो कॅलरी पदार्थ खायचे आहे ते या दुधाचा वापर करू शकतात. यात इतर दुधापेक्षा 80 टक्के कमी कॅलरी असतात. (खरं की खोटं? Covaxin साठी गाईच्या सीरमचा वापर?) लो शुगर मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी दुधापेक्षा बदामाचं दूध घ्यावं. त्यात साखरेचं प्रमाण फारच कमी असतं, यात फायबरही मोठ्या प्रमाणात असतं. व्हिटॅमिन ई आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन ईच्या 20 ते 50 टक्के गरज दररोज बदामाचं दूध घेतल्याने पूर्ण होते.व्हिटॅमिन ई उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करत. तणाव कमी करण्यात मदत करतं. (पिलाय का कधी 'पांढरा चहा'? फायदे ऐकून व्हाल थक्क) कॅल्शियम दररोज 1 ग्लास बदाम दूध दिवसभरातील 20 ते 45 टक्के कॅल्शियमची गरज पूर्ण होते. हृदय,हाडं,मज्जातंतू यांचं कार्य सुधारतं. व्हिटॅमिन डी हृदय,हाडं आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी,शरीराला व्हिटॅमन डीची आवश्यक असते, व्हिटॅमन डीचा सर्वात मोठा स्रोत सूर्यप्रकाश असला तरी, बदामांचं दूध ही सर्वात चांगला पर्याय आहे. (जिममध्ये न जाता करा कार्डिओ वर्कआऊट; जाणून घ्या योग्य पद्धत) लॅक्टोज फ्री ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास आहे. त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. जगभरात असे कोट्यवधी लोक आहेत ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास आहे. त्यामुळे या दुधाला पर्याय म्हणून सोयमिल्क वापरलं जातं. ज्यांना सोयमिल्क आवडत नाही त्यांच्यासाठी बदामाचं दूध चांगला पर्याय आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Milk combinations

    पुढील बातम्या